पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग चवथा. --- श्रीकृष्ण जो जो मोठे होऊं लागले व आपण धाडलेले मोठमोठे राक्षसहि त्यांनी ठार केल्याचे जेव्हां कंसास कळले तेव्हां कंसाच्या हृदयाचा गयानें थरकाप झाला. व आपला मृत्यु जिवंतपणें गोकुळांत वावरत आहे व वाढत आहे व त्यापुढें आपल्या उपायांची कांहींच मात्रा चालत नाह न त्याच्या पोटांत सारखे "" धस् धस् करीत होतें. व खातांपितां, बसताउउता त्यास सगळीकडे कृष्ण दिसत होता. कुठे कांहीं खुट् वाजले की " कृष्ण आला कीं काय असा त्यास भास होई. कृष्ण आतां काय करतो आहे, मग काय करतो आहे याची रावणाप्रमाणेच तोहि आपल्या गुप्त हेरांकडून वारंवार बातमी ठेवीत असे. तथापि अवशपर्णे मृत्यूच्या जबड्यांत उभे असतांही त्यांतून सुटण्यास नैराश्यपूर्ण धडपड प्रत्येक मानव करतोच. त्याप्रमाणें आमचा कंसही आपल्याकडून होतील ते निर्फळ यत्न करीत होता. उदा- हरणार्थ, अगदी शेवटींसुद्रां त्यानें आपला भाऊ केशी ह्यास कृष्णास मारण्यास धाडलें होतें. पण केशीच्या भयंकर घोड्यास व केशीस कृष्णांनी एकदमच ठार केलें होतें. तेव्हां कंसाला म्हणजे आतां विशेष आशा राहिली होती अशांतला अर्थ नाहीं. त्याला आपला मृत्यु उघड उघड डोळ्यांपुढे दिसत होता व आज नाहीं उद्यां आपण त्या श्रीकृष्णाच्या हातून मरणार असाच ध्वनि त्याच्या अंतरात्म्यांतून उठत होता. होतां होतां कंसाच्या मृत्यूची व गोपींच्या विरहाची वेळ जवळ येऊन ठेपली. कंसाला श्रीकृष्णाचा वैरी या नात्यानें किती ध्यास लागला होता है आम्ही वर सांगि तलेंच आहे. शेवटीं दिव्याच्या जवळ जवळ गेलेला पतंग ज्याप्रमाणें त्या दीपावर शेवटची झडप घालतो व स्वतः अग्निस्वरूप बनन जातो त्याप्रमाणें कंसानेंहि श्रीकृ- ष्णाशीं व बलरामाशीं मल्लयुद्ध खेळण्याचा घाट घातला व त्यांत आपली आहुती दिली. आपला शत्रु, मृत्यु, कृतांत म्हणून का होईना पण कंसाला गोपींच्या इतकाच कृष्णाचा ध्यास लागला होता. प्रेमानें व भयाने लागणाऱ्या ध्यासाचा परिणाम एकच; प्रकार निराळे एवढेच. पण प्रेमाच्या इनकाच जर भयाचा ध्यास आहे तर फळही तेंच कां न मिळावें ? कारण परमेश्वर इतका 'उदारांचा राणा ' आहे की भक्तांस आणि वैऱ्यांस दोघांसही त्यांच्या उत्कट ध्यासाबद्दल तो तेंच मोक्षप्राप्तीचें बक्षीस देतो. पण इतका दुष्टपणा अंगी असणें- आमरणांत ईश्वरद्रोह करण्याइतका खंबीरपणा