पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५५ ] 66 सक्षय सकलंक दृष्टिही लोभे । ” गोपींची निराशा व त्यांचा पारमार्थिक सवतीमत्सर व शेवटीं समाधान मानण्याचा प्रकार यांचे चित्र पंतानीं एखाद्या कुशल चित्रकारा- प्रमाणे रेखाटलें आहे. किंबहुना हृदयींचे भाव हे चित्रकारापेक्षांही कवीच कांकणभर अधिक सरस दाखवूं शकतात. एक सखी खट्टू होऊन दुसरीस म्हणते काय सांगूं सखे ! “ कुब्जेच्या भाग्याचा भर भारी आमुचाहि ओसरला | सरला असोनि चक्रा आम्हीं, वक्रा असोनि ती सरला ! " दुसरीच्या सवतीमत्सराच्या चरफ- डाटाचा पारा याहूनही वरच्या ' डिग्री श्चा आहे. व त्या भरांत कृष्णः स ' घुबड म्हण्ण्यापर्यंतसुद्धां तिची पायरी जाऊन पोचली आहे. " दासी असो नसो परि जन कुब्जा म्हणति काय ती कुबडी । विदरीहि कामुका स्त्री घुबडाला काय नावडे घुबडी ? " पण शेवटीं " सखि ती सुखी असो गे श्रीकृष्णाशीं करोनि केलीला ! , C ११ (( अर्से म्हणून सर्वजण स्वस्थ बसल्या आहेत--किंबहुना सक्षय सकलंक " अशा विधूकडे लोभावलेल्या दृष्टीने पहाणान्या चकोरीप्रमाणें त्या प्रेमाचा विरह झाल्यामुळे त्यांचे देह वाळून गेले आहेत व जीवनावेगळी ' झालेल्या 'मासोळी 'प्रमाणें त्यांची तळमळ झालेली पुढे आपणांस वाचावयास मिळणार आहे. अस्तु. 6 , प्रियवाचक ! अशा तऱ्हेच्या प्रेमळ प्रसंगांतून त्या प्रेममय प्रभूला काढून पुडील भागांत आम्हांस त्यास मथुरेस घेऊन जावें लागणार आहे हे पाहून आम्हांसही वाईट चाटते. त्या गोपींच्याबरोबर आमचेंहि हृदय भरून येतें. पण चरित्रलेखकाचें कार्य मोठें कठिण असतें, त्याला असले कठिण प्रसंगहि वर्णावे लागतात त्याला त्याचा नाइलाज असतो. कारण जशी गोष्ट घडली तशी सांगणे त्यास भागच असतें. तर चला वाचक ! घट्ट मन करून तो विरहवर्णनाचा देखावा पहाण्यास चला.