पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५७ ] मनांत असणे —६ी कांहीं लहान सहान गोष्ट नव्हे. पश्चात्तापाचा वाराहि अंगास स्पर्शे न देतां, भक्तीच्या मलयानिलाचा वासहि न घेतां प्रत्यक्ष परमेश्वरांस अवतार घ्यायला लावण्याइतका तीव्र विष्णुद्वेष अंगी असणें ही एक तामसी तपश्चर्या आहे- ही तामसी असहकारिता आहे - व सहकारितेप्रमाणेंच असहकारितेचें स्वातंत्र्य- मुक्तिसुख हेच अखेरचें फल आहे. तेव्हां “तया कंसा भयसंभ्र" श्रीकृष्ण "प्राप्यु" झाला है ईश्वराच्या उदार साम्राज्यांत योग्यच झाले. असो. 4 " 66 कंसानें--कृष्णध्यासानें वेडा झालेल्या, विरोधी भक्तीच्या पराकोटीस पोंचलेल्या कंसानें--अक्रूर नांवाच्या इसमास कृष्णबलरामांस मथुरेस घेऊन येण्यास धाडून दिलें. अक्रूर गोकुळात नंदगृहीं आला व त्यानें कंसाचा हुकूम नंदांस कळविला. राजाज्ञेस मान देऊन नंदाला आपली बालकें धाडणे भागच होतें. हां हां म्हणतां ही बातमी सर्व गोकुळभर झाली. मग त्या शोकाला काय विचारतां? सग- ळाकडे एकच हाहाःकार झाला ! गोपिकांना, गोपांना, नंदयशोदेला अन्नपाणी सुद्धां गोड लागेना. प्रातःकाळीं जेव्हां श्रीकृष्णबलरामांस स्थावर घालून अक्रूराची स्वारी निघाली त्या वेळेस सर्व गोकुळ शोकानें भरून गेले. गाईवांसरांचा गोपाळ आज त्यांना सोडून जाणार म्हणून बिचारी गाईवासरेंसुद्धां ढळढळां रडूं लागलीं ! गोपी त्या अक्रुरांस म्हणाल्या तुझें ठेविले नाम अक्रूर । परि तुजसारिखा नसे निर्दय थोर. ” यशोदेला भडभडून येऊन ती म्हणते " मम सांवळे कान्हाई | जग- न्मोहने कृष्णाबाई । तुझे गुण आठवूं किती काई । मिती नाहीं तयांतें ॥ " असे श्रीधर कवि म्हणतात. "जीवनावीण मीन जैसे | गोकुळींचे लोक तळमळती तैसे + यशोदेशीं मूर्च्छा येतसे । धांवतसे थापाठीं ॥ माझे विसाविया जगजीवना । तुझें मुख पाहो॑ दे मन-मोहना | येई मज प्रेमाचा पन्हा । पाजूं कोणा सांगपा ? ॥ माझे सावळे कान्छाई । उभी राहे कृष्णाबाई | तुजवेगळ्या दिशा दाही | वोस झाल्या मज आतां " अशा रीतीनें यशोदेचा विलाप श्रीधरानीं आपल्या " भोळ्याभाब- ड्यांस रडविणाऱ्य' ” भाषेंत वर्णिला आहे ! तो वाचून कोणाचें बरें नेत्र पाण्यानें भरून येणार नाहीत ! गोपीकांचा विलाप श्रीधर कवि वर्णितातः - " तंव गोपिका आल्या धांवत । दोहीं हातीं हृदय पिटित । कितीएक पडती मूच्छगत । थोर प्राणांत ओढवला || एक धरणीवरी लोळती । एक दीर्घ स्वरे हांका देती । एक अवनी- वरि कपाळ पिटिती । प्राणांतगती ओडवली ॥ एक म्हणती गेला सांवळा । आतां अभि लावा गोकुळा.. ......हा चांडाळा अक्रूग परियेशी । अकस्मात कोठोनि आलासी ।