पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[३]

आल्हाद वाटल्यावांचून रहाणार नाहीं असें मला वाटतें. या दोन विशेषांमुळे, रा. साने यांचें पुस्तक, रा. ब. चिं. वि. वैद्य यांचें जें, श्रीकृष्णाचें ' चरित्र ’ या दृष्टीनें लिहिलेलें अत्यंत वाचनीय व नमुनेदार पुस्तक आहे, त्याहून निराळ्या स्वरूपाचें झालें आहे; म्हणून याचीही कांहीं विशिष्ट वाचकवर्गास उपयुक्तता वाटेल. प्रस्तुत पुस्तकांत कित्येक ठिकाणीं, झकास बेत , नारद...... चालते झाले अशासारखे, विषयाच्या गांभीर्याची हानि करणारे शब्द प्रयोग झाले आहेत, परंतु अशीं स्थळे फार थोडीं आहेत.
 सारांश, विषयविवेचनाच्या आणि भाषाशैलीच्या दृष्टीने पाहिले असतां,रा. साने यांचें पुस्तक चटकदार व बोधप्रद झालें आहे; त्यामुळे तें मुलां-मुलींच्या हाती देण्यास योग्य व उपयुक्त असून प्रौढ वाचकांसही ते वाचनीय वाटल्यावांचून रहाणार नाहीं असें माझें मत आहे.
 प्रस्तुत पुस्तकाबद्दल रा. साने यांचें मी अभिनंदन करितों व यापुढें त्यांच्या हातून अशीच वाङ्मयसेवा दीर्घकालपर्यंत होत राहो, असें मी मनःपूर्वक इच्छितों.

पुणे. माघ शु॥ द्वितीया शके १८४४, (ता. १९१९ २३. ) } श्री. नी. चापेकर.


 रा. साने यांचें भगवान् श्रीकृष्ण " हें नवें पुस्तक मी वाचून पाहिलें यांत अर्थात् एकच विषय श्रकृिष्णचरित्राचा घेतला आहे. पण तोच चित्ताकर्षक कसा होईल याचाच अनेक अंगांनीं प्रयत्न करून तो वर्णिलेला आहे. वर्णनांत कोठें कादंबरी, कोठें नाट्यखंड, कोठे इतिहास, कोठे तत्त्वविवेचन, अशा लेखनपद्धतीचा भास विषयपरत्वें होत असून एकंदर विवेचनपद्धति उद्बोधक अशी साधली आहे. ठिकठिकाणीं विषयपरत्वें इतर ग्रंथांतील अवतरणें सहज उपयोगांत आणल्यानें बहुश्रुतपणाचाही भास होतो. रा. साने हे असेच निरनिराळे तुटक विषय घेऊन