पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५४ ] "( रुसण्या फुगण्याच्या त्याच प्रेमाच्या दुसऱ्या छटा म्हणजे देवांशीं ह्या प्रेमसाम्राज्यांत होणाऱ्या ' खेळीमेळी' होत. बुद्धी जयांच्या जगजीवनांत " अशी बालगोपाल मंडळी " कान्हु संभालले संभाल आपुल्या गाई | आम्ही जातोले जातो घलाला बाई अशा तऱ्हेने श्रीकृष्णावर रसून - खेळांतल्या भांडणा- दिकांवरून रुसून त्यास म्हणत असत. पण 'प्रेमगोड ' गोणलकृष्ण त्यांची मने॑ तेव्हांच पुन्हां आपल्या मधुर वाणीनें उल्लसित करीत असे. "" 6 66 66 कंसाची प्रासद्ध दासी कुब्जा ही आठ ठिकाणीं जिचें अंग वांकडें आहे अशी अष्टांगवका संक्रांतीसारखी एक दासी होती. मथुरेस गेल्यावर श्रीकृष्णानी तिच्या भेळ्या भावास भुलून तिच्यावर विशेष प्रेम दाखविले तेव्हां गोपींना जो रागाचा झटका आला तो कांहीं पुसूच नका. श्रीकृष्णकन्य्याचें 'तें सुंदर मुख' व ती दिव्य मूर्ती पाहून बिचाया कुब्जेची इतकी तन्मय वृत्ति झाली की तिच्या सर्व भावांचा भेोळा लय श्रीकृष्णचरर्णी लागला व कृष्णाच्या प्रत्यक्ष शत्रूची ती बटीक असूनही या कृष्णप्रेमाच्या जोरावर ती लवकरच थोर अधिकारास पोचली. प्रभूच्या घरीं गोरे- काळे, लुळे-पांगळे, पंडित-दगड सगळे सारखेच. ज्यांचा भाव श्रेष्ठ ते त्याला प्रिय. म्हणोनि भक्ति गा एथ सरे । जाति प्रमाण " असे त्यांनी म्हटलेंच आहे. उंच नीच कांहीं नेर्णे भगवंत। सुटे भाव भक्त देखोनिया " असे तुकोया म्हणतात तें कांहीं खोटें नाहीं. परमात्म्याची दृष्टि बाह्य भपक्यावर कधीं भुलत नाहीं. अत्यंत प्रेमळपणानें भिल्लीणीनीं दिलेली बेरेंसुद्धां प्रभून रामावतारी खाल्लीं; प्रेमळ विदुराच्या कण्यासुद्धां कृष्णशिष्टाईच्या वेळेत प्रभून आनंदानें भक्षण केल्या पण दुर्योधनाच्या वरवरच्या " दाटुनि " केलेल्या " आग्रहा कडे त्यांनी लक्ष दिले नाहीं. त्याजवरून हीच गोष्ट सिद्ध होते. “ अपिचेत् सुदुराचारो ' क्षिप्रं भवति धर्मात्मा " व मां हि पार्थ व्यपाश्रित्य " ह्या श्लोकांवरील ज्ञानोबांची बहारदार टीका वाचावी म्हणजे भगवंत 'भावाचा भुकेला ' कसा आहे व यासाठींच तो कुब्जेच्या भावास कसा भुलला हे कळून येतें. " "" तेव्हां कुब्जेच्या भावास देव भुलले खरे. पण इतर गोपाचा त्या सवतीमत्सरानें कोण तडफडाट झाला. ( अर्थात् ही सर्व रुसणी फुगणीं प्रेमाचींच आहेत हे लक्षात ठेवावें. ) कुब्जेवर-अष्ठांगवका कुब्जेवर देव भाळले ही गोष्ट कळल्याबरोबर एक गोरटी गोपी दुसरीस हलक्या आवाजात विचारते " बाई सत्य वदसि है ? " नंतर एक निश्वास सोडून ती पुढे म्हणते “ प्रभुजन असतां कलंकही शोभे | चंद्रचि पहा जरिहि हा