पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५३ ] झटूं लागली. निशावायूच्या लहरी कृष्णगोपींच्या गात्रांस सुखविण्याचा यत्न करूं लागल्या, त्यांच्या वसनांशी व मुक्त अलकराजींशी स्वेच्छ क्रीडूं लागल्या. यमुनेनें आपल्या कलकलरत्राच्या संगीताची मुरलीच्या संगीतांत भर घातली ! नर्तना । हर्षवर्तना। त्या दिव्य नृत्याचें आम्ही कोठवर वर्णन करणार ? जगाच्या प्रारंभापासून जगाच्या अंतापर्यंत जरी असा नाच नाचत राहिलें तरी तो पुरेसा वाटणार नाही. • असा हा हृदयाचा दिव्य नाच चालू असती " हा जीव ठायींच्या ठायींच विरावा , अर्से कोणास वाटणार नाहीं ? कविराज रे. टिळक म्हणतात करीना प्राणी । नच अन्य अभागी त्यासम जगती कोणी ! " खरें आहे; कविराज, आपली वाणी खोटी कशी असणार ? त्या दिव्य नर्तनाच्या स्वर्गीय समाधर्ताला ढोलनाचा आनंद ज्यानें कधींच चाखला नाहीं तो मनुष्य खरोखरच अभागी ! त्या रासक्रीडेचा आनंद भोगतां भोगतां किती काळ गेला याचा पत्ताच नाही. “ती रासकी- डेची राती । यि ब्रह्मषण्मास केली होती । " असें भगवान्च आपल्या मुखाने नाथां कडून सांगत आहेत. पण इतका अपरिमित काळ मिळूनही " गोपिका अर्धक्षण- मानिती । लक्करी कां गभस्ती उगवला ! " केवढी ही मौज ! ह्या समाधीसुखाला जगांतल्या इतिहासांत तोड सांपडेल काय ? अस्तु. 66 अशा तऱ्हेचा आनंद ज्या प्रभूच्या संगतींत लुटायला सांपडत असे त्या श्याम सुंदर कन्हय्याची मूर्ती पाहण्यासाठीं तें “हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेच्या " असाव्यात व श्रीकृष्णप्रभूची ती मदनमोहन आकृती कुठे क्षणैक दृष्टीआड झाली- व गोपगोपींची परीक्षा पाहण्यासाठी मुद्दामही देव कधी कधीं तसे करीत असत तर गोपींचा - सर्व गोकुळाचा जीव कासावीस होऊन जावा व " बतादे सखी कोन गली गये श्याम " सखे, तो कृष्ण कान्हा कुठे गेला तो तूं पाहिलास कांग ? तो कुठे दिसत नाहीं " असें म्हणत त्यावांचून न करंमून त्यांनी एकमेकांस प्रश्न करीत सुटावें हैं किती साहजीक आहे ? आपल्या पुढील कार्यासाठी श्रीकृष्णप्रभू ज्या वेळेस वृंदावनांतून मथुरेस निघाले व पुढे द्वारकेस गेले त्या वेळेस त्या विरहाच्या कल्पनेनें व पुढे प्रत्यक्ष विरहाने सर्व गोकुशची कशी शोचनीय स्थिति झाली, गोपींच्या करुण विलापाने - " अपि ग्रावा रोदत्यपि दलति व्रजस्य हृदयं " अशा शोकाने पाषाणासही पाझर फुटण्याची कशी वेळ आली त्याचें वर्णन आम्ही लव- करच करणार आहों. तत्पूर्वी ह्या प्रेमसंगीताच्या दिव्य मोहनाचे वर्णनाचा अनावर मोह आर्ता येथेंच आंवरतां घेऊन आपण त्याच प्रेमाच्या दुसऱ्या कांहीं छटा पाहूं.