पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५२ ] क्षणार्धात शेंकडो गोपी त्या मुरलीच्या तालावर करतालिका वाजवीत नाचत-- -- डोलत- निघाल्या ! मुक्तकेशपाश पाठीवर रुळत आहे, खांद्याखाली पदर गळलेला आहे, पण त्या बेभान अवस्थेत याची स्मृती कोणाला असणार ? त्या मुरलीच्या दिव्य नादानें मंत्रमुग्ध होऊन त्यांचे पाय त्या दिशेला नाचत चालले होते, शरीर हर्ष- रोमांचित--पुलकित-होऊन नाचाच्या तालावर डुलत होतें, मन व बुद्धि यांचा कुष्ण- स्वरूपीं लय झाला होता ! प्रेमाचें केवढे हें मोहन ! सर्व विश्वांतील अणुपरमाणु ज्या प्रेमाकर्षणाने एकत्र खेंचले जातात त्याच प्रेमाच्या दिव्य समाधींत नाचत-डुलत गोपी चालत्या होत्या ! अहाहा! त्या समाधींतील तें दिव्य डोलन ज्या मानवाला लाघेल तो खरा भाग्यवंत ! हरिनामाच्या तालाची ही केवढी तल्लीनता ! ज्यांच्या हृदयां- तलि परमार्थरस शुष्क होऊन गेला आहे, हरिनामाचें दिव्य संगीत ज्या अभागीं जीवांनी सबंध जन्मांत कधी ऐकले नाहीं त्यांनी हे श्रीकृष्णचरित्र न वाचलेलेंच एक- परी चांगलें; कारण तें " अरसिकेषु कवित्वनिवेदनं " व्हायचें ! पण हरिभक्तीचा ओलावा ज्यांच्या हृदयांत थोडासा तरी आहे त्यांनी " जय जय रामकृष्णहरी ! ' ह्या मृदंगाच्या ठेक्यावर चालणाऱ्या स्वर्गीय भजनाचे वेळची आपली स्वतःची मनःस्थिति आठवावी, पंढर्राच्या वाळवंटावर ह्याच दिव्य भजनाच्या तालावर लाखदी- डलाख वारकरी तासचे तास डुलत असतांना पाहून प्रत्यक्ष नास्तिकसुद्धा त्यांत कसा रंगून जातो - तन्मय होतो - हे लक्षांत घ्यावें म्हणजे गोपींच्या दिव्य समाधींतील आनंदाच्या स्वेच्छ डोलनाची त्यांस खरी कल्पना येईल. त्याच दिव्य तंद्रीच्या तालांत आपल्या स्वर्गीय नाचानें तारकांसही लज्जित करीत गोपी लवकरच वाळवंटावर- जेथें प्रभु “ अंगवक अधरीं धरि पांत्रा” असे उभे होते तेथे येऊन पोचल्या व त्याच उन्मादावस्थेंत कन्हय्याच्या भोवतीं त्यांनी नृत्याच्या फेर धरला ! त्या नाचाला जास्त बहार किंवा रंग चढावा म्हणून अनंतांनीं अपलीं अनंत रूपें प्रकट केलीं व प्रत्येक गोपीबरोबर एक एक कृष्ण तो दिव्य नाच नाचू लागले ! मध्य- वर्ती कृष्णाच्या मुरलीच्या तालावर कृष्णगोपींचा तो अलौकिक नाच संगीतयुक्त सुरू झाला तेव्हां " वाद्ये वाजविती सुर गोपोंसी गाय जैं हरी रासी । स्वर शोभला स्वर्गशीं जैसेचि शरीर तच्छरीराशीं !" आपला आकाशप्रांगणांतील नाच व "तारकांचे गायन य।पुढें कांहींच नाहीं असें वाटून तारका व तारकापति यांनीं तो केव्हांच उधळून देऊन त्या तारका पृथ्वीवरील तारकांचें तें दिव्य नृत्य आपल्या तेजपूर्ण नयनांनीं पाहूं लागल्या ! त्या दिव्य नाचाचे वेळी सर्व सृष्टिही त्यांच्या सुखांत भर घालण्यास ""