पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५१ ] ● ८ रासक्रीडेचा प्रसंग अशाच बद्दारीचा होता. शरदृतूंतले ते दिवस. मध्यरात्रीची वेळ झाली होती. सर्व जग निंद्रानंदांत विलीन झाले होतें. श्रीकृष्णप्रभूच्या ध्याना नंदांत गुंगत गुंगतां सर्व दिवस च्या श्रमांचा परिहार करण्यासठी निद्रादेवीनें गोपींचा देह आपल्या ताब्यांत घेतला होता. पण त्या गोपींची बुद्धि व त्यांचा आत्मा झोपे तही कन्हैय्याच्या शामसुंदर मूर्तीच्या ध्यानांत गुंग झाला होता --व्रजांगनांना त्याच परमेश्वरी सुखाचीं सुखस्वप्ने पडत होतीं ! व त्यामुळे त्यांच्या मुखावर -- हृदयविकार- दर्शी शुभ्र आरशावर--त्यांचे प्रतिबिंब मंदस्मिताच्या रूपानें उमटत होते ! त्यांच्या त्या सुमंद हास्यानें किंचित् बाहेर दिसणान्या अशा कुंदकलिकासदृश शुभ्र दंत- पंकींच्या चांदण्याची मुलावर विलक्षण शोभा विलसत होती ! आज पूर्णचंद्ररजनी होती. उघड्या टाकलेल्या गवाक्षद्वारांतून येणारे शुभ्र चंद्रकिरण त्यांच्या मुखांवर पसरून त्यांच्या मंदस्मिताच्या प्रभेशीं मिलाफ पावत होतें ! आज पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे वसुंधरा सुधांशूच्या रजतधारांच्या अमृतजलानें सुनात होत होतो. ' निरभ्र शारदी रात्रीं' सर्वत्र पिठासारखें शुभ्र चांदणें पडलें होतें. सर्वत्र शांत निस्तब्धता वसत होती. यमुनेच्या श्यामल जलांवर कृष्ण कन्दव्याच्या श्याम- कांतीशीं जणूं तद्रूप झालेल्या त्या श्यामवारिपृष्ठांवर - निशानाथ तारकापतीचे चंद्र किरण नाचत होते ! निशथिवायु मंदमंद वाहून तरंगभंग करीत होता ! त्या सुख- ददृश्यांत अवगाहन करीत कृष्णप्रभूची स्वारी नदीतटाकी उभी होती ! नदीकांटचा वालुकाप्रदेश, दूरवर दिसणारी वृक्षराजी, जवळच असलेला गोवर्धन पर्वत, कलकल संगीतानें श्रीहरीस सुखविणारी यमुना, व खुद्द भगवान् या सर्वांना सुधांशु आज अमृताचा अभिषेक घालीत होता. श्रीकृष्णप्रभूनीं तें दृश्य--तें रमणीय चित्ताल्हादक दृश्य -हास्यमुखानें क्षगैक अवलोकन केले ! त्यांनी सुनील आकाशाकडे दृष्टि फेंकली. नलिनभोमंडलाच्या विस्तीर्ण पटावर लक्षावधि तारकांचा सलज्ज चमचमाट सुकं होता ! सर्वोच्या मध्यभागी तारकानाथ विराजत होता ! आपल्या पतीला मध्ये घालून तारकासुंदरौनी जणों त्याच्या भोवती सुलील नृत्याचा फेर आकाशप्रांग. णांत धरला होता ! सुधांशूच्या दिव्य मुरलीच्या तालावर चाललेलें तें स्वर्गीय नृत्य पाहून प्रभून मंद स्मित करें ! तारकांनो ! तुमच्यासारख्या दिव्य अप्सरा मजजवळ नाहीत असे तुम्हांस वाटते काय ? ह्या पहा, आतांच मी त्यांना बोलवतों व मग पाहूया कोणाचा नाच सरस ठरतो तें ! " असे म्हणून श्रीकृष्णानीं आपली भुवन मोहिनी मुरली काढली व ती वाजविण्यास सुरवात केली ! -