पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५० ] आनंद आहे तो त्या मुक्तींतही नाहीं " अशा तऱ्हेचा केवढा आग्रह नामदेव तुका- रामादि साधुसंतांनी देवापाशीं धरलेला होता तो पहावा म्हणजे कळेल. ज्ञानोत्तर- भक्तीची -- अद्वैतभाव कळूनही द्वैतांत जी गम्मत आहे त्याची गोडी कांहीं औरच आहे. खुद्द परमेश्वरासही ह्य | आनंदाच्या गोडीचा अनिवार मोह असे व गीताक-- धनप्रसंगी प्रेमभरानें अर्जुनाला दृढालिंगन देऊन दोघांचें ऐक्य करूं पाहणाऱ्य देवानींही असें अद्वैत झाल्यावर द्वैतांतील आनंद चाखावयास मिळणार नाहीं म्हणून “ आलेली ही उर्मी - हा उमाळा - माझा माझ्याच ठायीं जिरो " अशा तऱ्हेचे उद्गार काढल्याचें ज्ञानेश्वरींत जें वर्णन आहे ते ह्याचेंच दर्शक आहे. अस्तु. तेव्हां अशा तऱ्हेचा दिव्य आनंद मनमुराद लुटण्यास गोपी नेहमी एका पाया- वर तयार असत हैं काय सांगायला पाहिजे ? कारण आपल्या ह्या संसाराच्या विविध व्यापांत चित्ताला खरी शांती, खरे सुख, व खरा आनंद यांची अहर्निश तळ. मळ लागलेली असूनही तें कोणासही मिळत नाहीं. तें हवें असेल तर त्या ईश्वरी सुखाकडेच धांव घेतली पाहिजे. राजाच्या राजवाड्यापासून तो शेतकऱ्याच्या झोपडीपर्यंत प्रत्येक मनुष्याला असे वाटत असतें कीं " माझें कांहीं तरी हरव आहे; " पण तें हरपलेलें चित्सौख्य धुंडाळण्यासाठी तो बापडा पुन्हां त्याच विषयमृगजलांत उडी घेतो ! गरीब बिचारा ! पण अशाहि स्थितीत गोपींसारख्या भाग्यवान् प्राण्यांना ते खरें ' सुखनिधान सांपडते. व एकदां तें सांपडल्यावर मग त्या आनंदाला काय विचारतां ? मग अशा प्राण्याला संसारही नकोसा होतो; व त्या सौख्यसमुद्रांत - त्या अमृतसागरांत कितीही बुड्या मारल्या तरी पुरेशाच वाटत नाहीत. संसारतापांनी तापलेल्या गोपींसारख्या जीवांना तो एक शीतल विश्रांतीचा आधार असतो. म्हणूनच गोपी त्या कृष्णकन्ह- य्याच्या ध्यानांत सदा रंगलेल्या असत व कृष्णाची त्रैलोक्यमोहिनी मुरली वाजली किंवा त्याची सुंदर मूर्ति दृष्टीस पडली कीं गोपिका तन्मय होऊन जात ! त्यांच्या हातांतलें काम विसरून जाऊन जिकडून तें मधुरतम संगीत ऐकू आलें तिकडे कर- तालिकांच्या नाचावर- तालावर त्या चालूं लागत | गोपींसारख्या मानवांनाच नव्हे तर “ गोधर्नी बहु पुढे नच जावें । ठाव एकचि धरूनि थिजावें " ह्या पंडितवर्णना- प्रमाणे गाईंना देखील जागव्या जागीं थबकायला लावण्याची मोहनी कन्हय्याच्या मुर लोन होती ! ( 4