पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ 88 ] स्वयें स्वतांला आ लेंगावें शक्य कसें आतां । त्रिपुर्टि लोप होउनी एकलें तत्त्व जगीं उरतां ? ॥ जलें जलां बुडवावें कैसें ? कैसें जाळावें-- । अग्नीनें अग्निला ? सांग मज कैसें हैं व्हावें ॥ अशीच ठेवी अंतर्दृष्टी सौख्य सदा लागे । बहिर्वृत्तिच्या पाठिलागुनी नर जगतीं भागे ॥ हृदया असतां सर्व सुखाच्या आरामा वास । भ्रांतालागीं पहा ! लागला विषयीं हव्यास ! ॥ काम तिथें तो राम नसे गे ! राम तिथें काम । कामराम हे सहचर नसती तत्त्व असे ठाम ! ॥ राम पुरवितो काम मनींचे सकलहि, परि काम । राम भेटिचें काम करीना ! व्हावें निष्काम ! ॥ ( राम मुखीं त्या काम न बाधे' संतांची वाणी । जगीं न होइल फोल कधीं ती, सौख्याची खाणी: तुला बाधला कारण होतें अद्वैताज्ञान । सांग परी जाहले अतांना ' कामाचें हरण ? । '

प्रियवाचक ! वरील रम्य उलगडा वाचून तुमचें खास संपाधान झाले असेल अर्से आम्हांस वाटतें. जी राधेची स्थिति तीच सर्व गोपींची अवस्था; आणि अनंत रूपानें नटलेल्या त्या अनंतानें रासक्रीडेसारख्या प्रसंगी सर्वाची कामशांति वरीलप्रमाणेच. करून दिव्य अद्वैतानंद लुटला आहे. कारण “ त्रिविधं नरकस्यैद द्वारं नाशनमात्मनः ” असा उपदेश करणा-या भगवंतास त्या त्रिविध द्वारांपैकी काम हें एक द्वार आहे हें पूर्ण ठाऊक होतें व तीं द्वारें बंद झाल्याशिवाय अधःपातापासूनचा बचाव होऊन गोपी वरच्या मागास लागणार नाहीत याची त्यांस पूर्ण जागीत्र होती. मदनारि शंकर-कीं ज्या शंकरांनीं “ कोधं प्रभो ! संहर संहर " अशा मरुद्रणांच्या प्रार्थनेस न जुमानतां आपल्या तृतीय नेत्राच्या प्रखरानीच्या ज्वालांचा झोत सोडून रागाच्या सपाटयांत " भस्मावशेषं मदनं चकार मदनास उभा जाळला- तो प्रत्यक्ष शंकरही ज्या प्रभूची “पायवणी”--पायापासून निघालेली गंगा “ माथा वाहे " --मस्तकावर धारण: .