पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४५] करतो व त्या प्रभूचें नांव अखंड स्मरतो तोच प्रभु त्याच मदनाच्या चेष्टा गोपींशीं खेळेल ही गोष्टच किती हास्यास्पद दिसते ? व ह्याच अर्थानें लावावयाचा असेल तर “मत्कामा रमणं जारं " इत्यादि श्लोक प्रक्षिप्त असावा असे वाटतें. कारण शुकाचार्यो- सारख्या अत्यंत श्रेष्ठ ब्रह्मचाऱ्यानेही ज्याची स्तुति गाइली, विसाव्या शतकांतले रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, रामतीर्थ इत्यादि थोर महात्म्यांनीं सुद्धां ज्याचें गुणवर्णन केलें, व कबीरासारख्या शेंकडों भगवद्भक्तांनीं ज्या प्रेमाचे गोडवे गाइले त्या प्रेमांत--त्या दिव्य अलौकिक प्रेमांत- वैषयिक पशुवृत्तींचा चिखल कालवला असेल अशी कल्पनासुद्धां करण्यास मन धजावत नाहीं. खरोखर या रासक्रीडेंत आम्हांस व्यभिचार दिसावा हे आमच्या विकृत दृष्टीचेंच दर्शक आहे ! कारण आम्ही या आक्षेपकांस असे विचारतों की, " पापविचाराच्या नुसत्या छायेर्नेही दूषित झालेल्या हृदयाच्या सिंहासनावर तो विश्वसाम्राज्याचा प्रभु क्षणभरही विसांवणार नाहीं " हे आपणांस ठाऊक नाहीं काय ? " विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असतां मी न भेटें जाण " असें श्रीहरि नाथमुखानें सांगत आहेत, तिकडे आपले लक्ष नाहीं काय ? त्या सुखप्राप्तीसाठीं योगाभ्यासी झालेला सदाशिव भिल्लीणीस भुलला व त्यामुळे त्या बापड्यास त्या दिव्य सुखाची प्राप्ती झाली नाहीं " असे श्रीहरि सांगतात, यांतील अर्थाचें मर्म आपल्या लक्षांत येतें काय ? येत असेल तर ज्या विषयसुखांत डबल्यामुळे बिचारा हतभागी शंकर तें अलौकिक सुख प्राप्त करून घेऊं शकला नाहीं त्याच विषयसुखाची खैरात या रासक्रीडेंत झाली, अशा तऱ्हेचा अविचारी आरोप कृपाकरून आपण या रास- क्रीडेवर करूं नका ! अहो टीकाकार ! जर या रासक्रीडेत त्याच विषयकर्दमाचा चिखल तुडवला गेला असता तर प्रत्यक्ष मदन आनंदानें नाचावयास लागला मसता काय ? पण तें रासकीडेचें सुख ह्या विषयसुखांहूनही उच्च, दिव्य, पवित्र व मंगल आहे हे पाहून बिचारा खिन्न झाला: " अरेरे ! ज्या सौख्याच्या जोरावर अनंग असूनही मीं त्रैलोक्याला झुलविलें व माझ्या चरणाचे दास बनविलें - शंकर, ब्रह्मा, इंद्र, चंद्र इत्यादि मोठमोठीं चेंडेही ज्या मीं आपल्या अतुल शरसंधानानें लोळवली त्या मलाही ह्या सुखाची गोडी कळूं नये अं ? हाय ! भगवन् ! कन्हय्या- लाल 1 ते सुख ते सुख आपण मला दाखबाल काय ? अशा तऱ्हेचे विचार त्या CC अनेगा 'चे हृदयांत एकच गर्दी करूं लागले “ हाय ! प्रभो ! तें सुख आपण मला दसिवाच, मी आपणास अनन्य शरण आहे!" असे म्हणून जेव्हां त्यानें कृष्ण