पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४३ ] बोलुनि ऐशा बोला, निश्चल क्षणैक जो बसली । तंद्रि लागली राधेची तो धांवत वनमाळी -- ॥ तेथ पातला, मधुर कराने कुरवाळुनि वदना । “ राधे ! राधे ! सत्वरि पाही या राधारमणा ! वाणी उठली दिव्य अंबरीं ! राधाही उठली । सलज्ज धांवे; परस्परांची घट्ट मिठी पडली ॥ ओठांलागीं ओठ मिळाले, नयनां नयन जुळे ! | मदनमोहनें त्या श्रीकृष्णें तिजला शांतविलें ॥ परी खरें तें चुंबन नोहें दिव्य ज्ञानशब्द | एका ओष्ठा मधुनी दुसऱ्या ओती गोविंद ! ॥ नेत्रमिलन ? छे, मुळ नव्हें तें; ज्ञानरवीकिरण । या नयनांतुनि दुज्य। नयनिं ते घुसवी श्रीकृष्ण ! ॥ ज्ञानरवीच्या किरणें मेला हृदयि कामव्याळ । कामाच्या लहरिंचें बाष्प वा करितो गोपाळ ! ॥ घट्ट मिठांच्या मिषें हरीनें हरिले अज्ञान । आलिंगनमिष वरी दाविलें अर्थ खरा भिन्न ! ॥ 8 हृदयांची ती भेट जहाली सुंदर अनवद्या | निजहृदयींची तिच्या घातली हृदयं ज्ञानविद्या ! ॥ विषया॑संगे धांवत होती बाह्य मनोदृष्टी । आंत खेचली कृष्णकन्हैयें करण्या सुखपृष्टी || 6 "" “ कसें वाटतें ? काय दिसें तुज ? सांग मला राधे ! । कामज्वर - यातना अजुनि कां तुजलागीं बाधे ! अष्टभाव प्रकटले जाहलें विश्व सकल कृष्ण । खाली वरतीं बाह्य भीतरीं एक दिसे कृष्ण ! ऐकुनि या राधेच्या बोला कृष्ण सखा वदला । " कवणें कवणां आलिंगावें ? सांग अतां मजला ? ॥