पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विद्वानांचे अभिप्राय.


 रा. गं. रा. साने यांनी लिहिलेले भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र हे पुस्तक वाचून पाहिले . पुस्तक खरोखरच रम्य झाले आहे असे मला वाटते. श्रीकृष्णाचे चरित्र निरनिराळ्या दृष्टीने पाहण्यासारखे असून प्रत्येक पेहरूने त्याची माहिती अ वर्णनीय आहे हे हिंदुस्थानच्या लोकांना सांगावयास नकोच . आज हजारो वर्षे अनेक साधू अनेक कवी या चरित्राचा रसास्वाद घेऊन ते गात आले आहेत त्यातल्या त्यात भक्ती रसाचे रम्य आणि निरातीशय अधिष्ठान अशा दृष्टीने आमच्या महाराष्ट्रातील संत कवींनी ते आपापल्या अमोल ग्रंथातुन गायले आहे . या संत कवींचे सुंदर व हृदय हलवून सोडणारे निरनिराळे बोल आपल्या वाणी त ग्रंथीत करून रासाने यांनी याच भक्तीरसधिष्ठानदृष्टीने या पुस्तकात हे चरित्र लिहिले असल्याने आमच्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रीय भागवत भक्त आबालवृद्ध स्त्री-पुरुष जनतेस हे चरित्र आवडेल अशी मला खात्री आहे .

पुणे ता २१/१/२३

चिंतामण विनायक वैद्य

 रा रा गंगाधर रामचंद्र साने बीए यांनी लिहिलेल्या 'भगवान श्रीकृष्ण' या आटपशील आटपशीर व छोटेखानी पुस्तकाचे छापील फर्मे मी वाचले. त्यापूर्वी त्यांनी दिलेली हस्तलिखित प्रतही वाचून पाहिली होती. दोन्ही वेळच्या वाचनांवरून माझा प्रस्तुत पुस्तकाविषयी फार चांगला ग्रह झाला हे लिहिण्यास मला आनंद वाटतो. मुला मुलींच्या मनावर सहजरितीने ज्यांच्या वाचनाच्या योगाने धार्मिक आणि नीतितत्त्वांचे संस्कार ठसतील अशा तऱ्हेच्या पुस्तकांच्या उणीवेचा प्रश्न अजूनही समाधानकारक रीतीने सूट-