पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २२ ] 39 " सुरू झाली. पण परमात्मा तिच्या हातीं थोडेच सांपडतात ! ते चपळांतले चपळ ! यशोदेला धांवतां धांवतां दम लागला. या धांवपळीचा धिंगाणा मागल्या परसांत चालला होता. यशोदा दमून धांपा टाकूं लागली. आतां मातेचा अंत न पाहतां तिच्या हातीं लागावें व ती पुढे काय करते ते तर पहावें असें ठरवून देव शेवटीं उभे राहिले. तेव्हां लगेच यशोदेनें त्याला धरून गुलामा ! सांपडलास कीं नाहीं शेवटीं (1) " असे म्हटलें. इथें जातां जातां परमेश्वरप्राप्तीच्या मार्गात अशा धापा टाकण्याची वेळ येऊन दम लागेपर्यंत परिश्रम करावे लागतात व शेवटीं हताश अवस्थेत परमेश्वराच्या कृपेनेंच परमात्मा "घांवतो " हातीं सांपडतो हें देवांनी दाखवून दिलें आहे. असो. यशोदा कृष्णाचे अंगावर काठी उगारून पुढे म्हणते, " लबाडा ! तुला फार खोड्या करायला पाहिजेत नाहींका ? आं? करशील का पुन्हां खोड्या ? पण श्रीकृष्णाची ती केंविलवाणी मुद्रा पाहून मातेच्या हातांतून छडी गळून पडली ! पंत ह्मणतात " यष्टि उगारी जों कर धरुनि करें तों तदश्रुतनुकंपा | पाहे, राहे ताडण, वारी त्या गोपिकोस अनुकंपा !” “ आई नाहींग ! मी माहीं पुन्हां खोड्या करणार ! " देव काकुळतीनें म्हणाले. तेव्हां यशोदा पुढे म्हणते “ बरं तर. पण थांब. तसा नाहीं तूं ऐकायचास. तुला कांहीं तरी शिक्षा केलीच पाहिजे. तुला आतां घराबाहेरच कांहीं वेळ पडूं देत नाहीं, थांब ! " असें ह्मणून तिनें जवळच पडलेल्या दाव्यांनीं श्रीकृष्णाला उखळीला बांधून टाकण्याचा विचार केला ! पण अहंकाराने मी कोणचीही गोष्ट करीन म्हटलें कीं त्यांत अपेश ठेवलेलेच ! अहंकार विसरून तन्मय होऊन ईश्वरास जेव्हां शरण जावें तेव्हां कार्यभाग होत असतो है तत्व इथेंहि देवानीं दाखवून दिलेंच. जी पळतांना गोष्ट तीच बांधतांना धांवतांना जेव्हां यशोदेचा अहंकार गळाला व ती अगदर्दी मेटाकुटीस आली तेव्हां देव तिच्या स्वाधीन झाले ! तरीहि तिला गर्व होऊन " सांपडलास कीं नाहीं गुलामा शेवटी माझ्या हातीं " असे ती ह्मणालीच. ह्या अहंकाराची गम्मत ही अशी आहे ! तो परमार्थमार्गावरील अगदी शेवटच्या पल्लयापर्यंत सुद्धां आपणास सोडीत नाहीं. नवल अहंकाराची गोठी । विशेषें नलगे अज्ञानापाठीं। सज्ञानाचे झोंबे कंठीं । नाना संकटी नाचवी ' अर्से ज्ञानोबा ह्मणतात ते लक्षांत ठेवण्यासारखे आहे. वास्तविक कर्ता करविता तोच असल्यामुळे व त्याच्याच रूपेनें त्याची प्राप्ति होत असल्यामुळे ज्ञानाची “ फुंज ” किती चुकीची आहे? पण हे पहावें कोणीं ? अस्तु. " ((