पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २३ ] तेव्हां यशोदेनें तें दावें उचलून त्यानें श्रीकृष्णाला बांधून टाकण्याचा विचार केला च ती त्याला -- सर्व विश्वाला मायेच्या बंधानें बांधणाऱ्या गोविंदास -- बांधूं लागली. पण परमेश्वराचें स्वरूप म्हणजे " तुका म्हणे व्यापक नभा । होई अणूंचाही गाभा अर्से असल्यामुळे ते॑ त्यांच्याच इच्छेवांचून दोरीच्या बंधांत कसे सांपडावें-- अडकावें ? दोरी चार बोटें कमी पडूं लागली. म्हणून यशोदेने दुसरें दावें घेऊन पहिल्यास जोडलें व बांधूं लागली तो पुन्हां आपले चार बोटें कमी ! अशा रीतीनें पांच पंचवीस दावीं बांधल्यावर यशोदा थकली व कंटाळली. तेव्हां देवांनी शेवटी आपणांस बांधून घेतलें तेव्हां यशोदेस " शेवटीं बांधलें बाई एकदांचें ! म्हणून आनंद झाला व दाव्याचें दुसरे टोंक निर्जीव अशा उखळीस तिने बांधून टाकलें. निर्जीव बिचारी उखळी तिला काय प्रतिकार करणार ? पण सजीव सचेतन प्राण्यास बांधणें तितकें सोपे नसतें. मग 'परमात्मा तर चैतन्यस्वरूपच पण भक्तीच्या व प्रेमाच्या बंधनानें असा निबंध- ईश्वरही बांधला जातो. अस्तु याप्रमाणें कृष्णास उखळाशीं बांधून व “ धांव आतां कसा धांवतोस ते " अर्से रागानें म्हणत यशोदा घरांत निघून गेली. व "" "" "( श्रीकृष्णास दामोदर " बनवून -- ' ज्याच्या उदरास दाम म्हणजे दावें (बांधले) · आहे ' असा याचा अर्थ; व परमेश्वरास हे नांव वरील प्रसंगावरूनच पडलें असावें है चाणाक्ष वाचकांच्या लक्षांत आलेंच असेल-- यशोदा घरांत कामास निघून गेल्यावर " आईनें आपणास वासरासारखे बांधले' ह्याच आनंदांत बापडा श्रीकृष्ण वासरा- ‘प्रमाणें हातापायांवर फिरूं लागला ! अपराधाबद्दल होणाऱ्या शिक्षेचें भानही नारा बाल्यावस्थेंतला अंतर्बाह्य आनंदाने भरलेला जीव त्या शिक्षेतच कसा आनंद शोधीत असतो- कारण अपराधाचीच जेथें जाणीव नाहीं तेथें शिक्षेचें महत्त्व तरी काय वाट णार ?--ह्याचें चित्र प्रभून येथें किती नामी रेखाटलें आहे ? असो. कृष्णजींची स्वारी त्या उखळासकट सरकत सरकत -- कारण चैतन्याला अचेतन वस्तू कोठवर अवरोध करणार - आपल्या अवतारकृत्यांतील एक उद्धाराचें कार्य करण्यासाठी, त्या परसांत उगवलेल्या यमलार्जुनांची मुक्तता करण्यासाठी त्यांच्या त्या दोन वृक्षांच्या मधून पलीकडे गेली. त्याबरोबर ते वृक्ष उन्मळून पडले व त्यांतून दोन नलकूबर गंधर्व निर्माण होऊन आपल्या मुक्ततेबद्दल त्यांनी हात जोडून प्रभूचें स्तुतिस्तोत्र गायिलें, च नंतर प्रभूच्या आज्ञेनें ते आपल्या गंधर्व लोकास निघून गेले. यमलार्जुनांच्या उन्म- ळून पडण्यानें जो धाड्दिशी आवाज झाला त्याबरोबर नंदयशोदा घाबरून परसांत यवत आलीं व " अगबाई ! माझं बाळ तर दगावलं नाहींना ? " म्हणत यशोदा