पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ २० ]


राच्या इच्छेत्रांचून थोडाच समाप्त होणार ? अद्याप श्रीकृष्णांचे बाल्य होतें. अजून त्यांना कंसासारखीं कित्येक धेंडें लोळवायचीं होतीं. असल्या शेंकडों माबळभटांनी श्रीकृष्णाचा एक केंस सुद्धां वांकडा झाला नसता. असो. माबळभटाचा तो उद्देश जाणून श्रीकृष्णांनीं लवकरच त्याला यमसदनी पाठविले हे सांगणे नकोच ! त्याच्याच पाठोपाठ कंसांनीं धाडलेल्या “ तृणावर्त ” व " शकटासुर " ह्या राक्षसांची-ही रामकृष्णांनी अशीच गच्छंति केली | तेव्हां कंस मनांत फार ' खोंचला '- खिन्न झाला ! व त्यानें तो प्रयत्न कांहीं दिवस सोडून दिला.

इकडे बालकृष्णाची नयनमनोहर मूर्ति दिवसोंदिवस शुक्लेंदुसारखी वाढत होती व आपल्या विविध लीलांनी सर्व गोकुळास आनंद देत होती. त्यांनीं गाई -वासरांच्या शेंपट्याच ओढाव्या, त्यांना दाव्यासून सोडूनच द्यावें, लोकांच्या येथील दही-दूध, लोणी चोरून खावें, शिंक्यावर असल्यास मडकें फोडून खालीं पडेल तें व तें सुद्धा एकटे नाहीं तर वाकड्या, पेंद्या इत्यादि सवंगड्यांसह खावें. याप्रमाणे नाना लीलांनीं त्यांनी सर्व गोकुळास पुरें पुरेसें करून सोडलें. " पहा पहा गे तुझा मुरारी। दह्य दुधाची करितो चोरी " ह्याप्रमाणें रोज “ यशोदातल्लीं" कडे व्रजांगना गाऱ्हाणें येऊन सांगू लागल्या. पण मौज ही कीं त्यामुळे त्यांचें प्रेम मात्र श्रीकृष्णावर अधिकाधिक वाढतच चाललें. कारण तीं गाऱ्हाणी ऐकून सावासारखा जवळ येऊन उभ्या राहिलेल्या कृष्णास यशोदा जर रागें भरूं लागली तर त्याच उलट तीस म्हणत " जाऊं देग यशोदे; त्यांत काय आहे ? लहानपणीं मुलांनी अशाच खोड्या केल्या पाहिजेत. आपल्याला दह्या दुधाला काय कमी आहे ईश्वराच्या कृपेनें ( !). आपल्या घरीं मुबलक दहीं दूध आहे. " नंतर श्रीकृष्णाकडे वांकड्या डोळ्यांनी पहात " खा म्हणावं त्या लबाडाला किती खातोस तें ! " असे त्या पुढे म्हणत असत. असो. याप्रमाणे नानाप्रकारच्या खोड्यांनीं आमचे भगवान् गोकुळांस नको नको करून सोडीत. एकदां तर त्यांची मजल एका गोपच्या वेणीची तिच्या भ्रताराच्या दाढीशीं गांठ मारून त्याची मौज पहाण्यापर्यंत गेली होती म्हणतात. दुसरे दिवशीं सकाळ ते लफडें यशोदेकडे निवाडयाला आल्यावर कृष्णाला हंसतां हंसतां पुरेवाट झाली. असो. पण या सर्वांबद्दल यशोदेच्या हातून कृष्णास एकदां चांगलेच शासन व्हायचा प्रसंग आला. तो असाः-

यशोदा एकदां ताक करीत व एकीकडे कन्हय्यालाल कृष्णाच्या सुंदर बालमूर्तीचें ध्यान करीत बसली होती. ताक घुसळतांना अंगास बसणाऱ्या हेलकाव्याबरोबर