पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचा आसमंतात्-भाग. गेलेल्या त्या स्त्रीची प्रेतयात्राही पुढे आम्ही पाहिली. स्त्रियांना मत देण्याचा अधिकार असावा, या प्रश्नाला संमत असणारे शेकडोसे लोक त्या प्रेतयात्रेत चालले होते. ही यात्रा लंडन शहरांतील ज्या रस्त्यांनी, रेलवे स्टेशनावर गेली, त्या सर्वांवर तमाशा पाहण्याला सहस्रावधि तमासगीर जमले होते. ते प्रेत स्कॉटलंड मध्ये नेले, व तें पुरण्याची क्रिया व तत्संबंधी धार्मिक प्रार्थना वगैरे तिकडेच करण्यांत आली. इकडे उन्हाळ्याच्या दिवसांत उद्यानोत्सव (गार्डन पार्टीज) करण्याचा प्रघात फारच लोकप्रिय आहे. प्राइम मिनिस्टरमुख्य प्रधान यांनी दिलेल्या अशा एका समारंभाला आम्ही गेलो होतो. लंडनमधील बहुतेक निरनिराळ्या राष्ट्रांतील समाजस्थितीचे निदर्शक व प्रतिनिधि, अशा मंडळीला निमंत्रण होतें, व अशी मंडळी पुष्कळशी आली होती. तसेच अर्ल व कौंटेस् आफ जर्सी यांनी आपल्या चित्रवत् सुंदर आस्टर्ले पार्कमध्ये दिलेल्या पार्टीलाही आम्ही गेलो होतो. दुसरें एक आनंददायी निमंत्रण नार्थ ब्रुक क्लबकडचे होते. तेथे मुंबईच्या गव्हर्नरचे काम करून परत आल्यानंतर लॉर्ड सिडेनह्याम ह्यांच्या सन्मानार्थ मेजवानी होती. त्या प्रसंगी, मद्रासचे माजी गव्हर्नर लॉर्ड आम्प्थिल, अध्यक्ष होते. लॉर्ड रे व लार्ड लाभिंगटन, हेही आलेले होते. मिस्टर व मिसेस रतन टाटा यांनी एक ईव्हिनिंग पार्टी ( सायंकाळची मेजवानी) दिली