पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. होती. तेथे गेल्या वेळी म्हैसूरचे युवराज, व दुसरी बरीचशी आंग्लो-इंडियन मंडळी, यांच्या भेटी झाल्या. तेथे मोठ्या आनंदांत काळ गेला. लंडन येथील आमच्या दिनचर्येमध्ये सामाजिक ( औपचारिक) भेटी व परतभेटीला वगैरे जाणे, हेही काही कमी महत्त्वाचे कार्य होते, असें नाही. आम्ही लार्ड व लेडी रे, लार्ड व लेडी लामिंगटन, व लार्ड व लेडी सिडेनह्याम, यांच्या भेटीला जाऊन आलो. तेही परतभेटीला आले. तसेंच सर चार्लस व लेडी आलिव्हंट, व सर जान व लेडी म्यूर म्याकेंझी, यांच्यासारख्या आमच्या जुन्या पूर्वीच्या व सन्मान्य मित्रांचे पुनर्दर्शन व भेटी झाल्याने, मोठा आनंद वाटला. ते हिंदुस्थानांत असतांना त्यांचा आमचा जो संबंध जडला होता, त्याचे स्मरण आम्हांला आनंदकारकच होते. टाइम्स ऑफ इंडिया पत्राचे मुख्य मालक, मिस्टर टी. जे. बेन्नेट, सी. आय. ई. यांच्याकडेही मी गेलो होतो. तेव्हां दक्षिणी ब्राम्हण मंडळीच्या सद्यःस्थितीसंबंधाने त्यांच्याशी बरेच चांगले व मजेदार भाषण झाले. क्याप्टन व मिसेस बॉईड कारपेन्टर यांनी कान्नाट रूम्स मध्ये ग्रेट ब्रिटनच्या समुद्रपारच्या राज्यविभागांतील हाय कमिशनर्स व एजन्टस जनरल, व इतर पाहुणे मंडळी, यांचे स्वागत व सन्मान करण्याचा प्रसंग घडावा म्हणून एक मेजवानी दिली. तिला निमंत्रण असल्याने मीही गेलो होतो. तो प्रसंग माझ्या आयुष्यातील अभिमानास्पद प्रसंगांपैकी एक होता.