पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. यांमुळे त्या सर्व समारंभाला विलक्षण वैभवशाली रूप,वर्णवैचित्र्य आणि तेजस्विता प्राप्त झाली होती.दुनियेच्या या भागाच्या मानाने तो देखावा अभूतपूर्वसा भासत होता. या प्रसंगी फारच उत्तम व चोख अदब राखली गेली होती. शहानशहा व महाराणी तेथे आल्याने या भव्य व वैभवशाली समाजाला एक विशेषच गंभीरपणाची शोभा प्राप्त झालेली होती. ___पुढेही अनेक वेळां आझाला शहानशहा व महाराणी साहेब यांना पाहण्याची संधि मिळाली. त्यांतही विशे. अतः हाइड पार्कमध्ये गार्ड लोकांच्या ब्रिगेडीचा रिव्यू व सलामी झाली तेव्हां व विंडसर येथे हौसहोल्ड क्याव्हलरी किंवा खास पागेची सलामी झाली तेव्हां.या दोन्ही प्रसंगी ब्रिटिश फौजेचे शिरोरत्न अशा या लष्करी लोकांचा उत्तम व थाटदार भारदस्तपणा, आणि त्यांच्या शिताफीच्या कवायती, यांचा मजवर फारच चांगला ठसा उमटला. आस्काट येथील घोड्याच्या शर्यतीच्या वेळी बादशहा व महाराणी बसले असतांना, सम्राट् व महाराज्ञी यांचे बादशाही आवारामध्ये आम्हांला दर्शन घडले. त्या दिवशी एक दुःखपर्यवसायी प्रकार घडून भारीच रसभंग झाला. मताभिलाषी स्त्रीमंडळाची निशाणे धारण केलेल्या एका स्त्रीने, शर्यतींत दवड. णाऱ्या बादशहाच्या घोड्यापुढे आपणास घालून घेतले. त्यामुळे तिला भारी दुखापत होऊन ती मरण पावली. याप्रमाणे बळी ७४,