पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचा आसमंतात्-भाग. झालेली आहे, असे आह्मीं ऐकिलें. या कॉलेजांत पूर्वी निवडणुकीने भरती होत असे, पण आतां परीक्षा घेतात. नुकत्याच झालेल्या परीक्षेला, जागा भरण्याच्या होत्या, तितकेच उमेदवार होते, ह्मणतात. _आम्ही लंडन येथे असतांना तेथील सीझन सामाजिक समा-- रंभांचा-जलशांचा-हंगाम-ऐन बहारीत होता. आम्हांला अशा निरनिराळ्या प्रसंगांला हजर राहण्याबद्दलची अनेक आमंत्रणे आली असल्याकारणाने या ऐषआरामसमारंभांच्या चालू असलेल्या सत्रांत सामील होऊन मजा पाहाण्याचा हक्क व बहुमान अनायासे मिळाला होता. सेंट जेम्स प्यालेस राजवाड्यांत झालेल्या बादशाही ' लेव्ही'ला ( दरबाराला ) मी गेलो होतो.. त्या प्रसंगी पुष्कळसे हिंदी गृहस्थ आलेले होते. पण या सर्वांमध्ये उत्कृष्ट, उज्ज्वल व प्रेक्षणीय प्रसंग बकिंगह्याम् प्यालेस मध्ये झालेला — स्टेट बॉल' किंवा बादशाही नाच हा होय. तेथील देखावा, आजवर माझ्या पाहाण्यांत आलेल्या सर्व प्रसंगांमध्ये खरोखर अव्वल प्रतीचा व अवर्णनीय भपकेदार होता. हिंदी राजपुत्र म्हणून बरेचसें जडजवाहीर माझ्या दृष्टीखालून गेले असले तथापि,या प्रंसगी मंडळींनी अंगावर घातलेल्या रत्नमण्यांचे तेज व अप्रतिम सौंदर्य पाहून मी अगदी चकित झालो.तसेच या समारंभास आलेल्या स्त्रियांचे अतिशयच छानदार कपडे आणि लष्करी व दरबारी लोकांचे भपकेदार पोषाक,.