पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. -संहार होण्याचा संभव आहे, याविषयी मनांत अवश्य विचार येतात. याच्या अगदी उलट स्थिति 'ग्रीनविच्च' येथील जगप्रसिद्ध ऑब्झर्व्हेटरी किंवा वेधशालेची आहे. तीही आह्मीं जाऊन पाहिली. तिच्या द्वारे किती तरी नवीन उपयुक्त शास्त्रीय शोध लागलेले आहेत. ही वेधशाळा चांगली उंचावर आहे. तेथून टेम्स नदी दोन्ही बाजूला वळणावळणांनी संथपणे वहात असलेली सुरेख दिसते. पश्चिमेकडे क्रिस्टल प्यालेसकांचमहाल-याचे काचेचे छप्पर दिसत होते. हा महाल अगदी प्रथमच्या सार्वराष्ट्रीय प्रदर्शनाचे स्मारक आहे. तें प्रदर्शन, जगांतील सर्व राष्ट्रांची परस्पर स्नेहबंधने दृढतर व्हावी, या हेतूने भरविले गेले होते. पुढे एकदा आम्ही सांडहर्स्ट कॉलेजला गेलो. ही आमची सफर मोठी मजेची झाली. लष्करी खात्यांत हुद्देदार नेमलेल्या लोकांना येथे लष्करी शिक्षण दिले जाते. हिंदुस्थानांतील पोलिटिकल ( राजकीय ) खात्यांतील पुष्कळसे कामदार या कॉलेजांतून पास झालेले असतात. ही इमारत व तिच्या आसपासची विस्तृत व मोकळी मैदाने आणि अश्वारोहणशाला हे सर्व आह्मांला दाखविण्यांत आले. या कॉलेजांत सहा कंपन्या किंवा विभाग असून, त्यांपैकी प्रत्येक विभागांत निरनिराळे वर्ग आहेत. येथे सांगोपांग शिक्षण देण्याची सोय केलेली असून, या शिक्षणक्रमांत अलीकडील काही वर्षांत बरीच सुधारणा ७२