पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचा आसमंतात्-भाग. सृष्टिदेवतेच्या अमर्याद साधनांचा जणों या ठिकाणी एक सुंदर वस्तुपाठच दाखविला आहे की काय असा भास होतो. या विस्तीर्ण उपवनाच्या मध्यभागी एक अवाढव्य काचगृह उभे केलेले आहे. प्यासिफिक महासागरांतील बेटांमध्ये वाढणारे पंखेदार पानांचे तालसम वृक्ष, मसाले उत्पन्न होणारी हिंदुस्थानांतील झाडे, वटवृक्ष, कापशीची व निळीची झुडपें, या काचगृहाच्या विस्तीर्ण छताखाली उभी आहेत. त्याच्या पुढेच एक कृत्रिम तलाव आहे. त्याच्यांत छानदार हंस तरत असतात. जवळच थोड्याशा पायऱ्या उतरून गेल्यावर 'रॉकरी' किंवा शिलामय रमणीय स्थल आहे. तेथे पहाडी पुष्पें उमललेली आढळतात. एक जपानी बगीचा व शिखरदार मंदिर, यांच्या योगाने या मजेदार देखाव्याला प्राच्यरूप प्राप्त झालेले आहे. येथे सर्वांना पाहण्याला फुकट जाऊं देतात. प्रतिवर्षी तेथे सुमारे दहा लक्षांवर लोक पाहण्यास जातात. दुसऱ्या एका खेपेला आम्ही 'वुलविच अर्सनल' पाहून आलो. हा तोफा ओतण्याचा सरकारी कारखाना आहे. त्याच्यांत सुमारे बारा हजारांवर मजूर तोफा, बंदुका वगैरे आधुनिक संहारक यंत्रे व अवजारे तयार करण्याचे काम करीत असतात. आम्हीं तोफा तयार होत असलेल्या पाहिल्या. त्या अजस्र 'क्रेन'-पकडून उचलण्याची यंत्रे-यांमध्ये धरलेल्या होत्या. त्यांच्या द्वारे किती तरी मानवप्राण्यांचा