पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग सातवा. लंडनचा आसमंतात्-भाग. या राजधानीच्या सभोवार असलेली प्रेक्षणीय स्थळे आम्ही पुष्कळ वेळ जाऊन फिरून पाहून आलो. त्या सर्व खेपा आमाला चांगल्या मनोरंजक व मजेदार वाटल्या. टेम्स नदीच्या कांठी असलेली क्यू येथील रॉयल गार्डन्स-बादशाही बाग-मला फार पसंत पडली. तिच्यांत वळणे असलेले नागमोडी रस्ते, चतुराईने लावलेले फुलझाडांचे तक्ते, फुलझाडांच्या रक्षणशाला (Conservatories), आणि प्रशस्त हिरवळीचे तक्तेच्या तक्ते, इत्यादिकांची अप्रतिम योजना केलेली आहे. सर्व भूमंडळावरील ब्रिटिश हहींत उत्पन्न होणाऱ्या सर्व त-हेच्या वृक्षवल्ली, येथे लावल्या जाव्या, यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. खरोखर पृथ्वीच्या सर्व भागांतील सृष्टिसौंदर्याचे संमेलन-एकीकरण-मोठया संगतवार रीतीने केल्याचे या ठिकाणी नजरेस पडते. उष्ण व शीत या दोन्ही कटिबंधांचे येथे जसें कांहीं लग्न लावले गेले आहे, असे वाटते; आणि ७०