पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साम्राज्याची राजधानी. कायद्याच्या पुस्तकांचा लहानसा संग्रह होता. म्याजिस्ट्रेटचा पोषाक नेहमींचाच साधा होता. दाखल झालेल्या मुकदम्यांचा तो पद्धतशीर पण तडकाफडकी निकाल करीत होता. फाजील पुरावा ऐकण्याच्या कामी वेळाचा अपव्यय केला जात नव्हता. कोर्टाचे काम आटोपल्यावर तेथील एका कामदारानें कैद्यांच्या पिंजऱ्याकडे बोट दाखवीत म्हटले, यांतून कांहीं उत्तमोत्तम तसेच कित्येक अट्टल बदमाषही निघालेले आहेत. त्यावर मी कायद्याच्या तावडीत सांपडलेल्या उत्तमोत्तम पुरुषाचें नांव विचारतां चटकन् डॉक्तर जेमसन असे उत्तर मिळाले. त्याला त्याच्या इतिहासप्रसिद्ध अशा ट्रान्सव्हालमध्ये केलेल्या दौडीसंबंधाने पिंजऱ्यांत उभे राहावे लागले होते. प्रीव्ही कौन्सिलच्या ज्युडिशिअल कमेटीच्या एका बैठकीच्या वेळी हजर राहण्याची संधि मी मोठ्या आनंदाने साधून वेतली. त्यांच्या बैठकीचा कमरा साधासाच होता, आणि या कमिटीसमोर काम करण्याची पद्धत ह्मणण्यासारखी नियमबद्ध नव्हती. हिंदुस्थान व समुद्रपारचे इतर राज्यविभाग यांतून होणाऱ्या अपीलांची सुनावणी या कमेटीपुढे होते. हे कोर्ट केवळ सल्लागार म्हणून काम करीत असून त्याच्या समोर चाललेल्या अपीलांचा अखेरचा निकाल देण्याचे काम लाक्षणिकरीत्या बादशहांसाठी राखून ठेवितात. ६९