पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तसेंच माझे जुने मित्र रावसाहेब रामकृष्णपंत मोरमकर यांनी पुस्तक जलद छापवून देण्याच्या कामी परिश्रम घेतले, याबद्दल त्यांचेही आभार मानावे तितके थोडेच आहेत. आपल्या दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानिक व इतरही मंडळीपैकी बरेचजण विलायतेचा प्रवास करून आलेले आहेत, व त्यांतील कित्येकांनी आपल्या प्रवासाची वर्णने लिहून छापून प्रसिद्धही केलेली आहेत. त्या सर्वांमध्ये, माझ्या मतें स्वतंत्र विचार, सूक्ष्म निरीक्षण इत्यादि अनेक बाबतीत बहुतेक पहिल्या प्रतीचे अशा या प्रवासवृत्ताचा महाराष्ट्रीय वाचकांना परिचय करून देण्यासाठी केलेला हा प्रयत्न, यत्किचित्ही सिद्धीस गेला तरी केलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले, असें मी समजेन. मुंबई, । ४।८।१९१५. । मा. व्यं. लेले.