पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाषांतरकांची प्रस्तावना. हे पुस्तक मूळ इंग्रजीत विलायतेंतच छापून प्रसिद्ध झाले. त्याचे समालोचन तिकडील व हिंदुस्थानांतील बऱ्याचशा दैनिक पत्रांत आले होते, त्यावरून त्यांतील लेख व विचार पुष्कळ अंशी मान्य व विचारणीय असल्याचे दिसून आल्यावरून, अशा लेखांचा इकडील महाराष्ट्र वाचकवर्गाला परिचय झाला तर चांगलाच, कारण त्याच्यावरून अशा श्रीमान् , सुवुद्ध, सुशिक्षित, अनुभविक व प्रगमनशील लेखकाची खरी योग्यता व प्रौढी त्यांच्या देशबांधवांच्या चांगली लक्षात येईल, असे समजून, श्रीमंत बाबासाहेब यांच्याजवळ त्याचे भाषांतर करून तें प्रसिद्ध करण्याची परवानगी मागितली. ती त्यांनी आपल्या नेहमीच्या थोर स्वभावास अनुसरून मेहेरबानगी करून तेव्हांच दिली. याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. मूळ लेख फारच सुरेख व मार्मिक इंग्रजी भाषेत लिहिलेले असल्याबद्दल व विचारही फारच योग्य व प्रौढ असल्याबद्दल तज्ज्ञ लार्ड जार्ज हॅमिल्टन यांनी आपल्या प्रास्ताविक लेखांत उल्लेख केलेला आहे. त्या मानाने हे भाषांतर शक्य तितके चांगले उतरण्याचा प्रयत्न केला आहे. या कामी आमचे स्नेही रा. रा. गणेश दत्तात्रय कुलकर्णी, बी. ए., एल. एल्. बी., मुनसफ, इचलकरंजी, यांनी फार काळजीपूर्वक व प्रेमाने मदत करून भाषा व विचारसौष्टव आणण्याच्या कामी मदत केली, याबद्दल त्यांचा मी अत्यंत ऋणी व आभारी आहे.