पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लॉर्ड जॉर्ज हमिल्टन यांनी लिहिलेला उपोद्घात. हिंदुस्थानांतील एक सुशिक्षित व सुप्रसिद्ध संस्थानिक नारायणराव बाबासाहेब घोरपडे, चीफ ऑफ इचलकरंजी, यांनी लिहिलेल्या या लहानशा वर्णनपर लेखांना उपोद्घातादाखल चार शब्द लिहिग्याचे मी आनंदाने कबूल केलें. बाबासाहेबांचा जन्म इ. स. १८७० साली झाला.स. १८७६साली ते दत्तक होऊन गादीवर आले. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेज, आणि मुंबईचे एल्फिन्स्टन कॉलेज, यांच्यामध्ये त्यांचा विद्याभ्यास झाला. अधिकारारूढ झाल्यापासून आजवर त्यांनी आपल्या संस्थानाच्या व्यवस्थेमध्ये चांगले मन घालून यश संपादन केले आहे. तत्संबंधी अनुभव आणि उपजत ग्राहकता यांच्यामुळे हिंदुस्थानांतील राज्यकारभारासंबंधी बऱ्याच बाबतीत आधिकाराने बोलण्याची त्यांच्या अंगी योग्यता आलेली आहे. आपल्या संस्थानचे कर्ज वारून त्यांनी ते चांगल्या संपन्न स्थितीला आणिले आहे, व खजीन्यांत बरीच शिल्लक टाकली आहे. संस्थानांतील विद्याखाते आणि आरोग्यखातें यांच्याकडे त्यांनी चांगले लक्ष पुरविले आहे. इ.स. १९१० साली मुंबई येथे भरलेल्या शेतकी-परिषदेमध्ये योग्य रीतीने अध्यक्षाचें काम करता येण्या इतके त्यांनी शेतकी खात्याविषयी ज्ञान संपादन केले आहे. सहकारी पतपेढ्या स्थापन करण्याच्या कामीही त्यांनी