पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. अजब काम समजले गेले होते. या साऱ्या मिरवणुकीतील मुख्य व प्रेक्षकांना अत्यंत आवडणारा भाग झटला म्हणजे जमिनीवरील व दर्यावर्दी लष्करी प्रदर्शन हा होता. तो मुख्यत: या शहराशी संबंध असलेल्या प्रांतिक फौजेच्या पलटणी, निरनिराळे क्याडेट कोर, बॉय स्कौट्स, दायी स्कौटस व मुलांच्या ब्रिगेडी, यांनी संघटित होती! त्यांतील मुले खूप ऐटीने पावले टाकीत होती. त्यांच्यापैकी पुष्कळांच्या पुढे त्यांचेच ब्यांड वाजत होते. इंग्लंड देशांत आजकाल वाढत्या पिढीला में उत्कृष्ट शारीरशिक्षण दिले जात आहे, त्याचे चकित करून सोडणारे व पक्के मनावर ठसण्याजोगे नमूने या मुलांच्या लष्करी चालीवरून डोळ्यांसमोर येत होते. या मिरवणुकीच्या सर्व रस्त्यांवर दोन्ही बाजूंस जमलेली प्रेक्षक लोकांची चिकार गर्दी पाहून, भपकेदार तमाशे, मिरवणुकी व ते पाहण्याची हांव, पूर्वेकडील लोकांप्रमाणेच पाश्चिमात्यांच्याही अंगी किती तरी प्रबळ व खिळलेली आहे, यासंबंधाने माझी खात्री दृढतर झाली. ___ बो स्ट्रीट मधील पोलीस कोर्ट में या राजधानीतील किरकोळ गुन्ह्यांची झटपट चौकशी करण्याचे मुख्य न्यायाचें कोर्ट होय. तें मी पाहण्यास गेल्या वेळी इंग्रजी न्याय इन्साफ करण्याच्या त-हेची प्रथम व प्रत्यक्ष ओळख होण्याची मला संधि मिळाली. म्याजिस्ट्रेट एका उंचशा लिहिण्याच्या मेजाजवळ बसला होता. जवळच