पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साम्राज्याची राजधानी. पाहत असतांना मला कमी आनंद झाला किंवा कमी कौतुक वाटले असें नाही. ही मिरवणूक ‘म्यान्शन हौस' पासून निघून ‘ला कोर्ट' ( न्यायाच्या कोर्टा ) पर्यंत गेली. तेथे या नव्या ' लॉर्ड मेयर' ने (समाजश्रेष्ठीने) आपल्या कामासंबंधाने शपथ घेण्याचा विधि झाला. ही सारी मिरवणूक फारच छान व भपकेदार होती, आणि त्यांतील अत्यंत प्रमुख देखावा ह्मणजे मेयरच्या भपकेदार रथाला सोन्याचा मुलामा केलेला असून, त्याला उत्तम चौकडी जोडलेली होती; आणि त्याच्या आघाडीला लाईफ गार्ड्स स्वारांची तुकडी ब्याडसहित चाललेली होती, हा होय. लंडनमधील प्राचीन कंपन्या व गिल्ड-निरनिराळ्या कारागीर लोकांच्या सनदी मंडळ्या-आपापली परंपराप्राप्त प्राचीन निशाणे फडकावीत चालले होते. तेही बरेच गमतीचे दिसत होते. न्यू रिव्हर कंपनीच्या स्थापनेचा त्रिशतसांवत्सरिक उत्सव याच वेळी साजरा करण्यांत आला होता. त्यांत तीनशे वर्षांपूर्वीच्या लार्ड मेयरच्या मिरवणुकीच्या समारंभांतील कांहीं देखाव्याचे पुर्तेपणी अनुकरण केले होते. रिव्हर जायंट ( नदीरूपी राक्षस ) याचा बारा फूट उंचीचा एक अवजड पुतळा तयार केला असून एक चांदीचें चिलखत घातलेला बटुवीर तो घेऊन आघाडीस चालला होता. लंडन शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी न्यू रिव्हर स्कीम उभारून तिचे काम पुरे करण्यांत आले होते. त्याचे प्रदर्शन करण्यासाठी हे एक द्योतक चिन्ह केलेले होते. त्या काळी हे एक भारी