पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ही सभा भरण्याची जागा पारिस येथील 'चेंबर आफ डेप्युटीज्' सारखीच अर्धगोलाकृति बांधलेली आहे. या संस्थेमध्ये बऱ्याच स्त्रियाही सभासद आहेत.सभासद या नात्याने त्या चांगले काम करीत आहेत इतकेच नव्हे, तर 'बोर्ड्स आफ् गार्डियन्स' च्या सभासदपणाचेही काम त्या उत्तम करितात. 'वर्क हौस' (अशक्त, बेरोजगारी लोकांना अटकावून ठेवून त्यांच्याकडून त्यांच्या योग्य काम घेऊन, त्यांच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची सोय करण्याच्या जागा) व ' इन्फर्मरी' (निराश्रित अपंग लोकांसाठी धर्मशाळेवजा जागा ) यांच्यामध्ये मुलें व गरीब आजारी लोक, यांची नीट काळजी घेणे, यासंबंधांत त्या मेंबर स्त्रियांच्या हातून चांगलेच काम होते आहे, हे ऐकून मला कौतुक व समाधान वाटले. __ या शहरामध्ये प्रतिवर्षी जे अनेक ठराविक समारंभ होतात, त्यांत 'लॉर्ड मेयर'च्या मिरवणुकीचा देखावा हा मुख्य होय. आह्मी लंडनमध्ये राहात असतांना, शेवटी शेवटी, तो आमाला पाहण्यास सांपडला. प्रसिद्ध राजपुरुषांविषयी प्रजाजनांनी दाखविलेली पूज्यता, भक्ति व आदर यांची तहा मी पूर्वी पाहिलेली होती. शहरांतील उत्तम प्रकारे शृंगारलेल्या रस्त्यांमधून नवीन नेमलेल्या 'लॉर्ड मेयर'ची स्वारी निघाली असतांना नागरिक बंधुजनांच्या हातून त्यांचे जे उत्साहपूर्वक व जयघोषयुक्त स्वागत होत असते, त्या विजययात्रेचा समारंभ