पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साम्राज्याची राजधानी. सर्वांना फुकट जाण्याला मोकळीक आहे. ही सर्व स्थळे चांगली फुरसतीने पाहून काळजीपूर्वक निरीक्षण करण्याजोगी आहेत. तेथून थोड्याशा अंतरावर, म्यान्शन हौस आहे. ते बांधण्यास सत्तर हजार पौंड, किंवा साडेदहा लक्ष रुपये लागले. प्रतिवर्षी जो नवीन ' लॉर्ड मेयर ' नेमला जातो, त्याचे सरकारी ठाणे या इमारतीत असते. या शहराच्या कार्पोरेशनला स्थानिक स्वराज्यासंबंधांत, त्याच्या प्राचीन परंपरेअन्वयें, विशिष्ट हक्क प्राप्त झालेले आहेत, हे येथे जातां जातां नमूद करण्याजोगे आहे. त्या कार्पोरेशनच्या ताब्यांत एक चौरस मैल शहराचा खास भाग आहे. त्याच्या हद्दीतून थेट पुढे जाणारे गंदेनाले, लोकशिक्षण आणि दुसऱ्या एक दोन बाबतींशिवाय करून, सारे स्थानिक अधिकार या कार्पोरेशनकडेच आहेत. लंडन शहराच्या इतर भागांहून अलग अशी. पोलिस व न्यायाची कोटेंही त्याची स्वतंत्र आहेत. शिवाय, त्यांच्या हद्दीबाहेर सात मैलांतल्या मार्केटांचा ( बाजारांचा ) मक्ताही त्याच्याकडे आहे. लंडन शह. राच्या बाकीच्या भागांमध्ये २८ 'बरो' किंवा विभाग केलेले आहेत. त्या सर्वांवर 'लंडन कौंटी कौन्सिल' चा अधिकार आहे. प्रत्येक ‘बरो'वर एकेक ' मेयर' नेमलेला असतो. 'लंडन कौंटी कौन्सिल 'च्या एका साप्ताहिक सभेला मी गेलो होतो. त्या संस्थेमध्ये प्रत्येक 'बरो' कडून प्रतिनिधि निवडलेले आहेत.