पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. फुटांच्या उंचीवर आहे. या देवालयांत पुरलेल्या थोर व शूर वीरांमध्ये नेल्सन् व वेलिंग्टन् जवळ जवळ पुरलेले आहेत.. इंग्लंडच्या इतर सुप्रसिद्ध महात्म्या पुरुषांना शेवटचे विश्रांतिस्थान वेस्टमिन्स्टर ऑबे मध्ये मिळालेले आहे. तीही एक. भारी शोभिवंत व भव्य इमारत आहे. तिचे बांधकाम प्रथमतः एडवर्ड दि कन्फेसर राजाने सुरू केलें; व तें विल्यम. दि कांकरर याच्या राज्यारोहणप्रसंगी नुकतेच पुरे झालें होते. त्या इमारतीमध्ये पुष्कळ राजे व राण्या दफन झाल्या. आहेत. नामांकित . कवि, धुरंधर मुत्सद्दी, शूर योद्धे, इत्यादिकांचाही तेथेच समावेश आहे. त्यांतच हिंदुस्थानच्या इतिहासांत नावाजलेले व सर्वमान्य असेही पुष्कळ लोक आहेत. हल्लींचे आपले सार्वभौम बादशहा आदिकरून.. बहुतेक सर्व इंग्लिश राजे लोकांचे राज्याभिषेकसमारंभ, याच प्राचीन इमारतीच्या प्राकारांत झालेले आहेत, ___ बाहेरून आलेल्या प्रेक्षकांचे अक्षय्य चित्त वेधणारी येथील दुसरी इमारत म्हणजे प्राचीन गिल्ड हॉल ही होय. मोठमोठे सामाजिक जलसे व परदेशी राज्यकर्ते आणि इतर विख्यात गृहस्थ, यांचे सार्वजनिक स्वागतसमारंभ करण्याची जागा म्हणून या गिल्ड हॉलची प्रसिद्धि आहे. त्याच्या जवळच एक अत्युत्तम पदार्थसंग्रहालय, चित्रशाळा व सार्वजनिक पुस्तकालय व वाचनालय ही आहेत. तेथे.