पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साम्राज्याची राजधानी. लंडनमधील प्रेक्षणीय वस्तु पाहणे म्हणजे एक दिव्यच करण्यापैकी होय ! प्रेक्षकांचे चित्त आकर्षण करणारी इतकी कांही स्थळे येथे आहेत की, या अर्वाचीन बाबिलॉन शहरांतील नानात-हेचे जणों निधीच असे चित्ताकर्षक व प्रेक्षणीय वस्तूंचे संग्रह, यांची नुसती तोंडओळख होण्यालासुद्धां महिनेच्या महिने लागतील. एक अमेरिकन कोट्याधीश सेंट पाल. च्या देवालयावर चढून तेथून या राजधानीचा देखावा 'पाहात होता. तेव्हां त्यानें, 'वाः, लुटून फस्त करण्याला काय तरी उत्तम शहर हे !' असे उद्गार काढल्याचे ह्मणतात. खरोखरच साऱ्या भूमंडळावर अपरंपार संपत्ति व वैभव यांच्या संबंधांत लंडनइतका अभिमान बाळगतां येणारी शहरें फारच थोडी आहेत. येथील सेंट पाल, देवालय ह्मणजे एक परंपराप्राप्त अमूल्य चीज आहे. त्याच्याविषयी कोणत्याही राष्ट्राला अभिमान व प्रौढी बाळगतां येईल. प्रथमचे देवालय सन १६६६ सालच्या भयंकर अग्निप्रलयामध्ये खाक झाले. त्याच जागी सर खिस्टोफर रेन याने सन १६७५ साली, हल्लींची प्रचंड इमारत पुरी केली. त्याचा खर्च कोळशावर कर बसवून भागविला होता. तेथील अत्यंत प्रमुख व नामांकित काम म्हणजे त्याचा प्रचंड व भव्य घुमट होय. त्या घुमटावर एक मोठा थोरला गोल व क्रॉस असे बसविलेले आहेत. तो क्रॉस जमिनीपासून सुमारे चारशें