पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. भेटीला जाऊन आलो. ते व त्यांचे सोबती, हल्ली हेन्डेन येथील एका खानगी शाळेत विद्याभ्यासासाठी राहिले आहेत. त्यांचे राहते घर सुरेख आहे, आणि एलिझाबेथ राणी कांहीं दिवस तेथे राहिली होती, यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आले आहे. तेथे असतांना तिने एक झाड लाविलें होतें. तें अद्यापि कायम आहे. ते माझ्या पाहण्यांत आले. हेडेन येथील लंडन फ्लाइंग गौंड्स किंवा आधुनिक विमानें उडविण्याच्या जागेतूनच मी पुढे काही दिवसांनी एका 'बायप्लेन' मधून प्रथम अंतरीक्षसंचार केला. हवेमध्ये वर उडून जाऊं लागतांना एक नवीनच प्रकारची व अंतःकरणाला उल्हास आणणारी वृत्ति होते. प्रारंभी मला किंचित् कचरल्यासारखे वाटले, ही गोष्ट मला कबूल केली पाहिजे. पण लवकरच ही भावना नाहीशी होऊन तिच्या ऐवजी मनांत विश्वास उत्पन्न झाला. वरच वर आकाशांत मेघमंडळाकडे जाऊं लागलों, तसा खाली असलेला जनसमुदाय, मुंग्यांच्या गजबजलेल्या वारुळासारखा दिसू लागला. लंडनचा अफाट विस्तार क्रमाक्रमाने, हळू हळू पसरलेल्या चित्रपटाप्रमाणे अधिकाधिक निदर्शनास येऊ लागला. वर जाण्याच्या वेळेप्रमाणेच खाली उतरणें सुखाने पार पडले, तेव्हां आमच्या राणीसाहेबांचा जीव खाली पडला. हे आमचे साहस केव्हां व कसे सुखरूप पार पडते, याविषयी त्या काही अंशी काळजीतच होत्या.