पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साम्राज्याची राजधानी. त्याच्या सभोवतालच्या अनेक सीमांत स्थळांचा देखावा पाहणाऱ्याच्या दृष्टीस पडतो. वर्ड्सवर्थ कवीने वेस्टमिन्स्टर पुलासंबंधाने एक सुप्रसिद्ध सॉनेट (सुभाषितपद्य ) लिहिलेले आहे. त्यांत त्याने त्या पुलावरून ऐन प्रातःकाळी दृष्टीस पडणाऱ्या लंडनच्या देखाव्याचे फारच अर्थपूर्ण, उज्ज्वल आणि चटकदार वर्णन केले आहे. ते मी हिंदुस्थानांत कॉलेजांत असतांना वाचले होते. तेव्हां त्या देखाव्याची मला फक्त अंधुक कल्पना आली होती. परंतु तो देखावा ज्यावेळी मी स्वतःच्या नेत्रांनी पाहिला, त्यावेळी माझ्या अंतःकरणामध्ये त्या कवीच्या स्फूर्तीचा अंशतः उद्गम झाला आणि लंडन व त्याचे सौंदर्य यांचें, या कविवर्याने में विशद चित्र रेखाटलेले आहे, त्याचे खरें मर्म पूर्णपणे माझ्या लक्षात आले, __लंडन येथे पोहोचल्यावर मी प्रथम इंडिया ऑफिसांत गेलों व बरोबर आणलेली ओळखीची पत्रे सादर केली. तेव्हां अर्ल यू, पर्मनंट अंडर सेक्रेटरी, पार्लमेंटरी अंडर सेक्रेटरी आणि कौन्सिलचे मेंबर लोक यांनी मोठ्या आदरपूर्वक मला भेटी दिल्या. लॉर्ड ऋयूबरोबर माझें पुष्कळ वेळ भाषण झाले. तेथील प्रमुख कायमच्या अधिकाऱ्यांशीही माझी बरीच संभाषणे झाली. त्यांतील कांही हिंदुस्थानांत गेलेले नव्हते, तरी त्यांनासुद्धां तिकडील कामाकारभाराची चांगलीच माहिती असल्याचे दिसून आले. याशिवाय मी लौकरच कोल्हापूरच्या राजपुत्रांच्या