पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. - या ठिकाणी मानवप्राण्यांचा इतका कांही प्रचंड समूह एकत्र झालेला आहे की, तो पाहून पाहणाऱ्याला स्वतःच्या तृणप्रायतेची तात्काळ प्रतीती होते. स्वतःचे व्यक्तिविषयक भान पार विसरून जाते. आपण एक कस्पटप्राय अणुरेणु किंवा या प्रचंड प्राणिमय महासागरांत एक यःकश्चित् बुबुदवत्, आहों, असें त्याला वाटू लागते. तेथील अजस्र व बादशाही इमारती, प्रशस्त व विस्तृत राजमार्गामध्ये फिरणाऱ्या मोटार गाड्या, टाक्सी क्याब, व नानात-हेची लहान मोठी वाहने आणि दुतर्फा रुंद व प्रशस्त फरसबंदी पायवाटांवरून, पुष्कळ अंशाने चांगला पोषाक केलेले पुरुष, स्त्रिया व मुले, यांची गर्दीची क सतत चाललेली रहदारी, इत्यादि गोष्टी पाहून, प्रेक्षकाच्या मनांतील कल्पनातरंगांना अधिकच ऊत येतो. या रहदारीतील काही लोकांचे चेहरे उदास असून ते काही तरी विशेष महत्त्वाच्या कामगिरीवर जणों तांतडीने जात असल्याचे वाटते. दुसरे कांहीं खुशालचंद गमतीने रस्त्याच्या बाजूच्या मोहक व रमणीय दुकानांकडे दृष्टि देत चाललेले दिसतात. ही दुकानें ह्मणजे लंडन शहरांतील राहणीची आल्हादकारक प्रदर्शनेंच होत. ___ या अनुपम अफाट राजधानीचा अतिउत्तम देखावा पाहण्याला नाक्याची जागा झटली मणजे टेम्स नदीवरील ठिकठिकाणच्या अनेक सुंदर पुलांपैकी एखाद्या पुलाचा सज्जा होय. या ठिकाणाहून विहंगमदृष्टया पाहिले असतांना, उद्योगमग्न व प्राणिसंचारामुळे जणों उचंबळणाऱ्या या शहराचा व