पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साम्राज्याची राजधानी. पूर्वक वाळवितात आणि गोणत्यांत घट्ट भरून, बाजारांत पाठवितात. लंडनमध्ये आह्मी हैड पार्कजवळ बेलीज होटेलमध्ये उतरलो. तेथे आम्ही मोठ्या आरामांत व सुखाने राहिलो. साऱ्या भूमंडळावर लंडन शहर फारच मोठे व समृद्ध आहे. तेथील विलक्षण वैचित्र्य व मोहकपणा, यांचे योग्य वर्णन करण्याला, तसा कसलेला व प्रतिभाशाली लेखकच पाहिजे. तेथील घडामोड अशा काही अवाढव्य प्रमाणावर आहे की, या राजधानीच्या शिवेंत प्रथमच पाऊल ठेवणारा परका मनुष्य प्रारंभी पार गांगरून जातो. आह्मां हिंदी लोकांना लंडन ह्मणजे एक भली थोरली उतारपेठ, किंवा अनंत चळवळींनी युक्त व गजबजलेले असें एक जणों मधमाशांचे प्रचंड पोवळेचसे भासते. ___ याच ठिकाणी खरोखर आखिल विश्वाचा विवर्तनकील आहे. कारण, पारिस किंवा न्यूयॉर्क यांचे पेक्षां लंडन शहर हे अधिक प्रमाणांत जगन्मित्र [ विश्वकुटुंबी Cosmopolitan ] आहे. तेथील वस्तींत भूगोलाच्या सर्वही भागांतून आकृष्ट झालेल्या नागरिकांचा समावेश होतो. या शहरच्या कोसोंगणती रस्त्यावर व पन्नाससाठ लक्ष वस्तीत, सर्व राष्ट्र, जाति व धर्म यांचे प्रतिनिधि प्रत्यही आढळतात. कारण, या राजधानीच्या स्वागतशील प्राकारांत जातिविषयक भेदाभेद पुष्कळ अंशाने मानला जात नाही.