पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग सहावा. साम्राज्याची राजधानी. 'हे लंडनच्या चमकणाऱ्या दीपांनो, तुम्ही आपल्या दीप्तीमुळे जणों त्या शहराच्या मुकुटांतील रत्नराजीच शोभतां आहां. हे लंडन शहरांतील ज्योतींनो, तुमच्या अंतर्भागी किती तरी वैभव व संपत्ति वास करिते आहे !' जी. आर्. सिम्स. लंडनला आम्ही ज्या रेलवेमार्गाने गेलों तो सुपीक, मजेदार चढ-उताराने युक्त, वृक्षराजींनी सुसमृद्ध व शोभिवंत, अशा प्रदेशांतून जातो. तेथील सुपीक जमीन आणि निरनिराळी व विपुल पिकें, यांच्यावरून केंट परगणा इंग्लंडमधील बगीचा ह्मणविला जातो. त्याच्यांतील पुष्कळच मोठमोठ्या शेतांमध्ये-हीं शेने पुढे आह्मीं समक्ष जाऊन पाहिलीं-हाप्सची फुले फुलली म्हणजे, ती वेचण्याला शेकडो आबालवृद्ध स्त्री-पुरुष जातात. तेथे त्यांना मनमुराद काम मिळतें. ही झाडे सुमारे दहा फूट उंच डांभांवर चढविलेली असतात. हाप्सचा देशी दारू तयार करण्याकडे उपयोग होतो. ही फुले वेचण्याचा हंगाम उन्हाळ्याच्या अखेरीचा असून ती वेचल्यानंतर काळजी