पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारिस व तेथील ऐषआराम. पण आली त्या फ्रेंच बंदराच्या जवळ जवळ पोहोंचलों, तशा काही थोडया टेकड्या डोकावू लागल्या. त्यांच्या नंतर कारखान्यांमधील धूर जाण्याच्या उंच नळ्यांचे-चिमण्यांचे बाह्यांग दिसू लागले. त्यावरून क्याले हे एक कारखान्यांचें व घडामोडींचे शहर असून इंग्लंड व फ्रान्स या देशांतील दळणवळणांचे मुख्य ठिकाण आहे असे दिसले. आह्मीं धि चानल (इंग्लिश खाडी ) ओलांडली तेव्हां समुद्र खवळलेला नव्हता. यामुळे समुद्र लागण्याच्या त्रासापासून आम्ही वांचलों. लौकरच डोव्हरजवळचे पांढरे शुभ्र पहाडांचे कडे ओळखता येऊ लागले. तेथला प्राचीन व भव्य किल्ला आपल्या उंच मोर्चावरून चानलवर गर्वाने डोकावत असलेलाही दिसू लागला. आह्मी आगबोटीवरून उतरल्याबरोबर जणों दुसऱ्या आपल्याच घरी पोहोंचलों, असें माझ्या अंतःकरणाला भासू लागले. पुढील अनुभवावरून ही भावना दृढतर झाली. ग्रेट ब्रिटन मधील किती तरी स्थळांविषयी मी इतके काही वाचलें ऐकले होते आणि इतकी काही चित्रं पाहिली होती की, वरचेवर पुष्कळचसे भाग व वस्तु पाहून, त्या जणों पूर्वपरिचयाच्या असाव्या असे वाटे. फार तर आमच्या खुद्द इलाख्याशिवाय हिंदुस्थानांतील इतर प्रदेशाविषयीं, मला असें कचितच ह्मणतां आले असते.