पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. जाई. पण व्यर्थ. या चाललेल्या प्रकारांत पुष्कळच जोराची चळवळ, हालचाल व कळकळ होती खरी, पण सारी तन्हा पालिमेंटच्या प्रतिनिधींच्या निवडणुकी होत असतांना उडणाऱ्या धांदलीसारखी दिसत होती. एका मोठ्या प्रबळ व थोर राष्ट्राचे जबाबदार प्रतिनिधि राजकार्य चालविण्यासाठी सभास्थानी विराजमान झाल्या प्रसंगी जो बोज व जें महत्त्व असणे अवश्य आहे, त्याचा त्याच्यांत लवलेश दिसत नव्हता. आम्हां प्राच्यदेशीयांच्या मनामध्ये सभ्य वर्तनाविषयी आदर पक्का बाणलेला असल्याने मला ही सरकारी काम करण्याची त हा विशेष योग्य किंवा आदरणीय वाटली नाही. कदाचित् आह्मी या प्रतिनिधींना त्यांच्या अत्यंत अव्यवस्थित स्थितीमध्ये पाहिले असेंही असेल. फ्रान्स देशांतील विशेष महनीय अशा सर्व ऐतिहासिक -गोष्टींशी अर्थात् पारिसचा निकट संबंध आहे. कोठेही जा, तीन नांवें ऐकण्यात येतात. नेपोलियन, जोन ऑफ आर्क व सेंट जिनीव्हीव्ह. त्यांतही नेपोलियन हा अग्रगण्य वीर होय. या ओजस्वी साहसिकासंबंधे कोणी काही म्हणो. एवढी गोष्ट खरी की, त्याने ज्या अनेक अत्यंत महत्त्वाच्या व भारी सुधारणा जारी केल्या त्यांच्यामुळे फ्रान्स देश आजकाल सुधारणेच्या काही बाबतींत विशेष अनुकरणीय बनला आहे. पारिसपासून क्यालेला जातांना वाटेत काही विशेष प्रकार पाहण्यांत आला नाही. रस्ता बहुतेक सपाट प्रदेशांतूनच आहे.