पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारिस व तेथील ऐषआराम. पण अशा लोकनियुक्त अधिकारी मंडळीच्या बचावासाठी इतकी भारी खटपट व सक्त कोशिस करणे भाग पडावें, हे एक दैवदुर्विलसितच म्हणावयाचें! तथापि अराजक मंडळीच्या चळवळीमुळे अशा प्रकारची खबरदारी घेणे जरूरीचे होते. ____ आंत गेल्यावर ग्यालरीमध्ये आमांस बसविले. आमी अंतरावर बसलो होतो तरी चाललेले काम पाहण्याला व भाषणे ऐकण्याला अडचण पडली नाही. त्या ठिकाणी चाललेला प्रकार मला विशेष भारदस्तपणाचा वाटला नाही. ही चेंबरची इमारत कांहीशी गोल थिएटराप्रमाणे आहे. तिच्यावरून प्राचीन रोमन फोरमचे काहीसे स्मरण होतें.मध्यभागी एक तक्तसें असतें. त्याच्यावर ठेवलेल्या खुर्चीवर अध्यक्ष बसतो. जमलेल्या मंडळीपुढे भाषण करणारा प्रतिनिधि तक्ताजवळ येऊन तेथून भाषण करितो. प्रत्येक पक्षापैकी निवडक प्रतिनिधींनाच बोलू दिले जाते. पण वाटेल तो प्रतिनिधि, चाललेल्या कामांत व भाषणांत, जणों हक्कानें, व्यत्यय आणतो, असे दिसत होते. वादविवाद रंगांत आला तसे प्रतिनिधि उतावळि व बेफाम होऊन त्यांचे मनोविकार प्रबळ झाले, व साराच गोंधळ झालेला दिसला. वरचेवर आपसांत बाचाबाची चाले. स्वस्थता करण्यासाठी सारखे ओरडून ओरडून अध्यक्षाचा घसा बसला, तरी त्याच्याकडे फारच थोडे लक्ष दिले जात होते. अध्यक्षाचा मान क्वचितच अगर नाहींच ह्मणण्याजोगा राखला जात होता. शांतता होण्यासाठी व शिस्त राखण्याकरितां घंटा किती तरी वेळ वाजविली.