पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ठेवलेल्या होत्या. अशा त-हेच्या इंग्रजी प्रदर्शनामध्ये कदाचित् व्यापारी दृष्टीची टापटीप व छानछोकी अधिक दृष्टीस पडती. पण तेथें उपयोगापेक्षां कौशल्यप्रदर्शनाकडे विशेष लक्ष दिलेलें दिसत होते. अशा त-हेच्या गोष्टी विशेष मोहक करण्यासाठी फ्रेंच लोक किती तरी झटतात, हे सहज लक्षात आल्यावांचून राहात नाही. उपाहारगृहें फारच काळजीपूर्वक सजवून तयार केलेली असतात, आणि त्यांच्या आश्रयदात्यांना सर्व त-हेच्या भौतिक सोई व आराम मिळून ते खूष राहतील, यासाठी. सर्व तजविजी करण्यांत बिलकुल कसर केली जात नाही. ब्रिटिश एम्बसी ( ब्रिटिश वकालती ) च्या मेहेरबानीमुळे आमाला येथील चेंबर आफ् डेप्युटीजचे काम पाहण्यास जाण्याची सवड मिळाली. तीही फारच चांगल्या व योग्य प्रसंगी. कारण, त्यावेळी तेथे सक्तीच्या लष्करी नोकरीची मुदत दोन वर्षांपासून तीन वर्षांपर्यंत वाढविण्याच्या भानगडीच्या प्रश्नाचा विचार चालू होता. तेथे फारच गर्दी होती. नियमित प्रेक्षकांपुर्तीच जागेची सोय केलेली असल्यामुळे, आमांला आमची पाळी येईतोपर्यंत वाट पाहावी लागली. याचा आम्हांला कंटाळासा आला. आझी पुष्कळसे कमरे ओलांडून गेलो. वाटेत अनेक कामदारांनी आमची तपासणी केली. यामुळे खास चेंबरमध्ये पोहोंचेतोंपर्यंत पुष्कळ वेळ मोडली. कोणराजाचे प्राणरक्षण करण्याचा प्रश्न असता तर इतकी सावधगिरी ठेवण्याची आवश्यकता कोणाच्याही लक्षात येती.