पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारिस व तेथील ऐषआराम. धूम्रमय हवेच्या मानानें, ते किती तरी चांगले वाटते. परंतु ब्रिटिश साम्राज्याची राजधानी में लंडन शहर, तेथें धूर कांहीं कमी असता तर तेंही पारिस शहरापेक्षा कमी सुंदर दिसलें असते असे नाही. तेथीलही पुष्कळसे रस्ते फारच प्रशस्त व सुरेख, अगदी पारिसच्या रस्त्यांच्या तोडीचे आहेत. फ्रान्स देशाची राजधानी ह्मणून पारिस शहराला जे महत्त्व आहे त्या मानाने त्या ठिकाणी विद्याजर्नाच्या साधनांची उणीव नाही. आक्सफर्ड व केंब्रीज येथील युनिव्हर्सिट्यांपेक्षा तेथील युनिव्हर्सिटी निराळ्या त-हेची असल्याचे दिसून आले. कारण, तेथे राहण्याच्या सोई असलेली कॉलेजें नाहींत. पारिसमध्ये राहण्याचा खर्चही कमी आहे. हे लक्षात घेतले असतां एक नवी परकी भाषा शिकण्याची अडचण नसती तर, पुष्कळशा हिंदी विद्यार्थ्यांना तेथे जाणे सोईचे पडते. तरी पण तसे करणे एकंदरीत फायदेशीर होते किंवा कसे, याचा संशयच आहे. ___ तेथील हिप्पोडोम ( अश्वशाळा ) मध्ये प्रतिवर्षी घोड्यांचे प्रदर्शन भरते. त्यांत घोडेस्वारीची कामें बरीच चांगली होतात. तसेच घोडयाचे जीन, साज, सामान, वगैरेचे नमूने तेथे ठेवलेले आहेत ते आम्ही पाहिले. वस्तुतः तेथे घोडा व त्याच्या उपयुक्ततेसंबंधी प्रत्येक वस्तु ठेवलेली दृष्टीस पडली. कांहीं सुप्रसिद्ध लष्करी घोडे व घोडेस्वार यांच्या तसबिरी