पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पूर्वेस 'क्लिओपाटा राणीची सुई' नांवाचा विलक्षण अखंड दगडाचा ( मिसर देशांतील विजयस्तंभ) आणून उभा केलेला आहे, तोही दिसतो. याच जागी पूर्वी गिलोटीन नांवाचे, शिरच्छेद करण्याचे भयंकर यंत्र उभे केलेले होते. सोळावा ल्यूई राजा व त्याची हतभागी राणी, रा यांचा ह्याच यंत्राने शिरच्छेद केला गेला होता. वय किंवा स्त्री पुरुष यांतील भेदाभेदांचा यत्किंचित् विचार न करतां, फ्रेंच सरदार घराण्यातील शेकडोंशे लोक त्या यंत्रानेच ठार केले गेले. त्या स्थळाकडे पाहतांच, ऐहिक सत्ता व अधिकार यांच्या विलक्षण परिवर्तनासंबंधी विचार मनांत आल्यावांचून राहिले नाहीत. त्यांतच प्रजासत्ताक राज्यव्यवस्थेमध्ये सुद्धां, तैमूरलंग किंवा अतिशय दुष्ट व क्रूर मांचू बादशहांच्या अमलांतल्या प्रमाणेच, जीविताविषयी अत्यंत बेभरंवशाची स्थिति होणे शक्य असते, अशाही प्रकारचे विचार मनांत आले. पारिसची हवा इतर युरोपांतील शहरांच्या मानाने फारच स्वच्छ व निर्मळ असते. ही गोष्ट तेथे जाणाऱ्या प्रत्येक नवख्या प्रवाशाला तेव्हांच स्पष्ट लक्षात येते. व ही या शहरासंबंधाची एक विशेष गोष्ट आहे. सुंदर पुतळे व इतर स्मारके आणि शोभिवंत इमारती यांच्या योगाने शिल्पकलेच्या बाबतीत हे शहर साऱ्या दुनयेत कोणत्याही शहराला हार जाण्याजोगें नाहीं. या भव्य इमारती व पुतळे, स्पष्ट व फार दुरून दिसून येतात. येथील वातावरण स्वच्छ व सतेज आहे. लंडन येथील कुंद व