पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारिस व तेथील ऐषआराम. विजय मिळविले त्या रणभूमीवरील स्मारक वस्तु व निशाणे ठेवलेली आहेत. दुसऱ्या एकांत अगदी आरंभापासून उपयोगांत आलेल्या तोफा व बंदुका ठेवलेल्या आहेत. एका जागेत भाले, बरच्या व तरवारी, यांचे सुरेखसें आयुधागार आहे. एका सबंध मजल्यावर फ्रेंच फौजेमध्ये उपयोगांत असलेले सर्व त-हेचे लष्करी पोषाख घातलेले पुतळे आहेत. तसेंच फ्रेंच फौजेच्या सुप्रसिद्ध छावण्या, वेढे व लष्करी कवायती यांचे नमूने दुसऱ्या एका जागी पाहण्यांत आले. आणखी एका मजल्यावर पृथ्वीवरील सर्व भागांतून फ्रेंच राजांना नजर आलेल्या लष्करी वस्तूंचा भला मोठा संग्रह आहे. त्यांमध्ये नेपोलियनला आलेल्याच नजरा किती तरी होत्या. तेथून निघण्यापूर्वी पुढील चौकांत सज्जाच्या मध्यभागी नेपोलियनचा मूळ आकाराचा पुतळा उभा केला आहे, तोही आम्ही पाहिला. हा पुतळा त्याच्या मार्शलच्या पोषाखांत आहे. 6. जगप्रसिद्ध एफ्फेल टॉवरवर आम्ही चढून गेलो. तेथून खाली पसरलेल्या चित्रविचित्र शहराचा विहंगमदृष्टीचा अत्युत्तम देखावा दृष्टीस पडतो. तो रंगीत भिंगें अगर दुर्बीण यांच्यांतून पाहिल्यास फारच मनोहर वाटतो. त्याच्या अफाट व चित्रविचित्र देखाव्यामध्ये फारच भव्य व टोलेजंग अशी आर्क डी ट्रायोंफ किंवा विजयकमान विशेष उठून दिसते. ती साऱ्या दुनयेतील अप्रतिम व अत्युत्तम विजयकमानींपैकी . एक प्रमुख कमान आहे. दिलेरीस राजवाड्यापलीकडे