पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. त्याच्या खाली एका वर्तुळाकार व उघडया हौदा-क्रिप्टमध्ये संगमरवरी दगडाच्या उंच अशा चबुत्र्यावर, त्याच दगडाची झारने दिलेली नेपोलियनची भरदार कबर आहे. या कबरीसभोवार नेपोलियनने मिळविलेल्या विशेष प्रसिद्ध विजयांचे निदर्शक असे, स्वच्छ पांढऱ्या संगमरवरी दगडांचे बारा पुतळे पाहऱ्यावर किंवा संरक्षक ह्मणून उभे केलेले आहेत. नेपोलियनचे प्रेत स. १८४० साली फ्रान्समध्ये आणले गेले. तेव्हां ही कबर तयार झाली नव्हती. पुढे काही वर्षांनी ते तिच्यांत ठेवले गेले. त्या गोल हौदांत जाण्याचा पंचरसी दरवाजा, नेपोलियननें आस्टर्लिट्झच्या लढाईत पाडाव केलेल्या तोफा गाळून बनविलेला आहे. तेथेच बाजूच्या एका कोठडीमध्ये नेपोलियनचा एक भाऊ व त्याचे कांहीं सेनाध्यक्ष, यांच्या कबरी आहेत. ज्या तोफेच्या गाड्यावरून त्या धुरंधर बादशहाच्या प्रेताची पेटी पारिस येथे आणली तो गाडाही आह्मीं पाहिला. जवळच्या खोलीत सेंट हेलेना बेटांत त्याच्या कबरीवर ठेवला असलेला दगड, तो मरण पावल्यावर वीस तासांतच घेतलेला त्याच्या चेहऱ्याचा ठसा, त्याने राज्यारोहणप्रसंगी घातलेला भव्य व मौल्यवान् झगा आणि त्याच्या कफनावर घातलेली चादर, हे जिन्नस ठेविलेले आहेत. तेही आही पाहिले. नंतर आम्ही या इमारतीला लागून असलेले पदार्थसंग्रहालय पाहिले. त्यांतील एका दालनांत फ्रेंच लोकांनी जे सुप्रसिद्ध ५०