पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारिस व तेथील ऐषआराम. बेमालूम केला आहे. येथील घुमटाची उंची २७५ फूट आहे. पृथ्वी आपल्या आंसाभोवती फिरते, याची प्रत्यक्ष सिद्धता करण्यासाठी पेंड्युलम् किंवा घड्याळाचा लंबक -याच्या चलनाच्या द्वारे अनुभव घेतला गेला, तो येथेंच. त्याच्या खालील गाभाऱ्यांत मिरॉबो, माराट, व्हाल्टेर व रूस्सो यांच्या कबरी आहेत. त्या आम्ही पाहिल्या. ____आणखी एक मनांत ठसण्यासारखी इमारत होटेल डी इन्व्हालिडिस् ही आह्मीं पाहिली. ती प्रारंभी चौदाव्या ल्यूई राजाने बांधविली. पुढे पहिल्या व तिसऱ्या नेपोलियनांनी, ती वाढवून तिची उत्तम दुरुस्ती करविली, आणि तिला पूर्वरूपाला आणली. तेथे ५००० जखमी शिपाई राहण्याची सोय केलेली असून, हल्ली त्यांत फक्त शंभरच शिपाई असलेले पाहून मला आश्चर्य वाटले. येथील भव्य मंदिराचे दोन भाग असून त्याच्या मध्यभागी एक उंच शोभिवंत स्थंडिल आहे. त्याच्यावर सभोवतालच्या, रंगीत तावदाने लावलेल्या, खिडक्यांतून सुवर्णाप्रमाणे दैदीप्यमान सूर्यप्रकाश पडतो. - यामधील जुना भाग जशाचा तसा आहे. त्याच्यांत लढायांमध्ये काबीज केलेली निशाणे ठेवल्यामुळे त्यास विलक्षण शोभा आली आहे. या जागेचा उपयोग हल्ली येथे रहाणारे शिपाई लोक प्रार्थनेसाठी करीत असतात. दुसऱ्या भागावर एक प्रचंड घुमट असून त्यास भव्य खांब दिलेले आहेत. तो आसपासच्या प्रदेशांत एक नाक्याचे ठिकाण झाला आहे.