पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. भारीच सुरेख आहेत. पहिली राज्यक्रांति व पुढे इ. स.. १७९२ ची काम्यूनची राज्यक्रांति, यांच्या वेळी या मंदिराची पुष्कळच नासाडी झाली. तरीही तें भव्य व प्रेक्षणीय स्थळ आहे. सभोवार पुष्कळ कोसपर्यंत ते दृग्गोचर होत असते. पांथियान् ही एक मोठी थोरली व भव्य इमारत आहे. ती पारिसची पुरस्कर्वी सती जिनीव्हीव्ह इजला अर्पण केलेल्या जुन्या प्रार्थनामंदिराच्या जागेवर पंधराव्या ल्युई राजाने बांधली आहे. या इमारतीचा सन १७९२ सालापासून पांथियान किंवा कीर्तिमंदिर ह्मणून उपयोग करूं लागले, व येथेंच फ्रान्स देशांतील विख्यात पुरुषांची प्रेतें पुरण्यांत येऊ लागली. पुढे दोन वेळां पुनः त्याचा मंदिराप्रमाणे उपयोग होण्याची तजवीज झाली. पण शेवटी स. १८८५ पासून त्याचा पूर्ववत् कबरस्थानासाठीच उपयोग केला जात आहे. त्याच्या आतील भाग ऐतिहासिक व दंतकथाविषयक चित्रे काढून सुशोभित केला आहे. राज्यक्रांतिद्योतक पुतळ्यांचा प्लास्तरचा कच्चा नमूना मध्यभागी उभा केलेला आहे. त्यावरून संगमरवराच्या पुतळ्याचे कामही सुरू आहे. वरच्या बाजूस एक चित्र आहे. त्यांत जिनीव्हीव्ह व जोन आफ् आर्क, या दोघीं साध्वींनी फ्रान्स देशाचे संरक्षण केले, त्या संबंधी भविष्याचे यथार्थ द्योतन केलेले आहे. जोन ऑफ आर्कच्या चरित्राचा द्योतक चित्रपट फारच प्रेक्षणीय आहे. त्याच्यांत विविध रंगांचा मिलाफ मोठया चातुर्याने व ४८