पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारिस व तेथील ऐषआराम. व्ह राजवाडा ह्मणजे वास्तविक एक पदार्थसंग्रहालयच होय. हे पदार्थसंग्रहालय जवळ जवळ ब्रिटिश म्युझियम इतके मोठे आहे आणि तेथे ठेवलेले जवाहीर अत्युत्तम पैलूदार व उत्कृष्ट कोंदण केलेले असून ते भारी किंमतीचे आहे. यासंबंधाने अशी आख्यायिका आहे की, राज्यक्रांतीच्या वेळी तें लुटले गेले होते. पुढे पारिस येथील एका घराचे छपर पाडतांना तें तेथें लपवून ठेवलेले अवचित हाती आले. त्याच्यांत कांहीं -सुरेख हिरे, 'अलाबास्तर'च्या उत्तमोउत्तम सुरया, जडावाचें अप्रतिम काम केलेल्या तरवारीच्या मुठी, वगैरे वस्तु आहेत. त्यांच्यावर नेहमी सक्त पाहारा राहतो. ते एका उत्तम कारागिराने तयार केलेल्या पेटीत ठेवलेले असून त्याला हात लागतांच, तें पेटीसह आपोआप खाली असलेल्या लोखंडी तिजोरीत उतरून बंद होतें ! पारिस शहराच्या बचावासाठी पूर्वी बास्टील नांवाचा किल्ला होता. त्यांतच राजकीय कारागृह होते. त्याची जागा आमी पाहिली. स. १७८९ साली पारिस येथील बिथरलेल्या प्रजाजनांनी हल्ला करून, तो किल्ला पाडाव केला. तेव्हांपासूनच सुप्रसिद्ध फ्रेंच राज्यक्रांतीचा ओनामा समजला जातो. त्या हल्ल्यात सामील असलेल्या सुमारे सहाशे इसमांची नांवें कोरलेली असलेला एक स्तंभ त्या जागी उभा केलेला आहे. नाट डाम् नांवाचे भव्य व विशाळ मंदिर माझ्या मनामध्ये फारच बिंबले. त्याचा प्रचंड दर्शनी भाग व बाजूचे मिनारे, ४७