पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. येथील कर्मणुकीचे निरनिराळे अपरिमित प्रकार पाहून कोणीही गोंधळूनच जाईल, आणि अनेक चित्रमहाल, नाटकगृहे, गायनवादनशाळा व सुखोपभोगाची इतर स्थळे, इतक्यांना या ठिकाणी सारखा लोकाश्रय कसा मिळू शकतो याचा कोणालाही अचंबा वाटेल. येथील सुंदर 'ऑपेरा हाउस' (नृत्यगायनशाळा ) मध्ये जाऊन तेथील एखाद्या प्रयोगनिरीक्षणाने देखील पुष्कळ नवीन गोष्टींचे ज्ञान प्राप्त होते. इतक्या प्रबललोकसत्तावादी देशामध्ये इतपत सरदारी व थाटमाट असू शकेल, असे कोणाला स्वप्नांत सुद्धा वाटणार नाही. इकडे बंदोबस्ताच्या कामी लष्करी लोकांची योजना केलेली पाहून मला काहीसे विलक्षण वाटले. शांतताभंग झाल्यास पोलिसाकडून योग्य बंदोबस्त राहण्याला कठिण पडते म्हणून किंवा केवळ भपका व थाट यांसाठी ही योजना आहे याची मला शंका आली. कारण, याच्यावरून प्रजासत्ताक राज्यव्यवस्थेत सुद्धां राजसत्ताक राज्यव्यवस्थेतल्या इतकाच थाटमाट व दर्शनी शोभा, यांविषयींची आवड जोरांत दिसून येते. लूव्ह राजवाड्यांत प्रदर्शनासाठी ठेवलेली प्राचीन चित्रकलानिपुणांच्या हातची चित्रे व इतर ललितकलाविषयक कामें पाहून माझें मन मोहून गेले. त्यांतील मिनिएचर्स (सूक्ष्म चित्रे)तर मला भारीच आवडली. लक्सेंबुर्ग येथील चित्रे व पुतळेही कमी मनोवेधक होते असे नाही.या साऱ्या वस्तु ब्रिटिश रायल् अक्याडमी'मध्ये प्रदर्शित झालेल्या वस्तूंच्या धरतीच्याच होत्या. हा ४६